नाशिक : ठाकरे बंधूंच्या ऐक्याला महायुतीच्या नेत्यांचा भरपूर मुद्द्यांचा इंधनपुरवठा महाविकास आघाडीचा होणार साफ सुपडा!!, अशीच खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था झालीय.
ठाकरे बंधूंच्या ऐक्याचा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसेना आणि मनसे यांचे कार्यकर्ते तर झटत आहेतच पण त्या पलीकडे जाऊन तो मेळावा “आणखी यशस्वी” व्हावा म्हणून महायुतीच्या नेत्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांचा इंधनपुरवठा चालवलाय. अमित केंद्रीय गृहमंत्री अमित शहांबरोबर पुण्यात झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे जय महाराष्ट्र बरोबर जय गुजरात म्हणाले त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना चेव आला. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार तोफा डागल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले त्यासाठी त्यांनी शरद पवारांचे उदाहरण दिले. चिकोडीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणात शरद पवार “जय महाराष्ट्र जय कर्नाटक” असे म्हणाले होते, याची आठवण या दोघांनी करून दिली. त्यामुळे शिवसेनेचे नेते आणखी भडकले. पण या सगळ्या मधून एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या मेळाव्यासाठी “जय महाराष्ट्र जय गुजरात” हा नवा मुद्दा उपलब्ध करून दिला.
त्याचवेळी केडिया नावाच्या उद्योजकाने राज ठाकरेंना डिवचणाच्या नावाखाली मराठीचा अपमान केला. राज ठाकरे यांचे गुंडगिरी थांबत नाही तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही अशी दमबाजी त्याने केली. या मुद्द्यावरून आग्रह आणि दूराग्रह असा शाब्दिक खेळ करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवा मुद्दा ठाकरे बंधूंना पुरविला.
– ठाकरे बंधूंपासून पवार अलग
ठाकरे बंधूंच्या उद्याच्या ऐक्य मेळाव्यात या मुद्द्यांवर तुफान फटकेबाजी होणार याची अटकळ महायुतीच्या नेत्यांनी बांधली. याचाच अर्थ असा की, ठाकरे बंधूंच्या बाजूने बाकीच्या सगळ्या विरोधकांची मते एकवटू द्यायची आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ करायचा इरादा महायुतीच्या नेत्यांनी मनाशी बांधला. तसेही ठाकरे बंधूंच्या ऐक्यामुळे त्यांची विशिष्ट ताकद वाढणार असली तरी ती भाजप किंवा बाकीच्या पक्षांची घटणार नसून महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतः शरद पवारांनीच ठाकरे बंधूंच्या ऐक्य मेळाव्यापासून स्वतःला दूर ठेवले. शिवाय त्यांनी मराठी – अमराठी, हिंदी – बिगर हिंदी अशा वादात पडायचे देखील टाळले.
पण काही झाले तरी मुंबई आणि महाराष्ट्रात हिंदी सक्ती विरुद्ध मराठी सक्ती, मराठी – अमराठी आणि हिंदी – बिगर हिंदी या वादामध्ये महायुती विरुद्ध ठाकरे बंधू अशीच लढाई होणार. या दोन शक्तींमध्येच मतं विभाजन होणार आणि मधल्या मध्ये काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी मार खाणार याची चिन्हे हळूहळू ठळकपणे दिसू लागलीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App