महायुतीचा सात जागांवर पेच, मात्र चर्चा अंतिम टप्प्यात!

भाजपाचे मताधिक्य ८ टक्क्यांनी वाढणार असल्याचं बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास


विशेष प्रतिनिधी

नागपूर : सहा-सात जागांवर पेच असून, त्यावर लवकर निर्णय होईल महायुतीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन तीन दिवसात चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते कोराडी (नागपूर) येथे वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.Mahayuti has not decided on seven seats but the discussion is in the final stage


महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांवर निवडणूक, 5 जागांवर महायुतीचा विजय सहज शक्य


बावनकुळे म्हणाले, रामेटक गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे, सध्या रामटेक शिवसेनकडेच आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल. तर अमरावतीची जागा भाजपाकडे असून १०० टक्के भाजपाच्या चिन्हावर लढू. देशात मोदी प्रधानमंत्री व्हावे यासाठी सर्व प्रयत्न करतील. संभाजीनगर जागेबाबत कोणताही तिढा नाही तर मुंबईच्या जागांबाबत शिंदे निर्णय घेतील. मनसे किंवा इतरांमुळे उमेदवार जाहीर करण्यास वेळ होत नाही.

याशिवाय महायुतीमधील भाजपासह सर्व १३ घटक पक्ष एकत्र निवडणूक लढविणार आहेत. प्रत्येक बुथवर आम्ही लक्ष केंद्रित केले. मोदी सरकारच्या काळात ५० वर्षांत जे मिळाले नाही ते १० वर्षांत मिळाले. या निवडणुकीत मागील भाजपाला सात ते आठ टक्के जादा मते मिळतील. ५१ टक्के मतदान घेऊन महाराष्ट्रात ४५ प्लस जागा महायुतीला मिळतील. पंतप्रधान कोण व्हावे हे जनतेला चांगले कळते, असेही ते म्हणाले

Mahayuti has not decided on seven seats but the discussion is in the final stage

महत्वाच्या बातम्या

 

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub