विशेष प्रतिनिधी
मुंबई :Mahavikas Aghadi महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होण्याच्या आधीच महाविकास आघाडीमधील वाद आता विकोपाला पोहोचला आहे. महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत मिळाले आहेत. जागा वाटपाबाबत आघाडीची सुरू असलेले चर्चा आता चांगलीच बिघडली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जागा वाटपाच्या चर्चेला उपस्थित असतील तर ठाकरे गट चर्चेला येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. इतकच नाही तर नाना पटोले यांची तक्रार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे देखील केली असल्याचे ठाकरे गटाने सांगितले आहे.Mahavikas Aghadi
जागा वाटपात विदर्भातील जागांबाबत नाना पटोले हे अडवणूक करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे आता जागा वाटपाचा तिढा आणखीनच वाढला असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे गटाने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे नाना पटोले यांची तक्रार देखील केली आहे. त्यातच नाना पटोले या संदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्याकडे पोहोचले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीत जागा वाटपाचा वाद कसा मिटतो, ते पहावे लागणार आहे.
जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आज सकाळीच उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली होती. यावेळी प्रतिक्रिया देतानाच त्यांनी आज जागा वाटपाचा निर्णय अंतिम होणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. इतकेच नाही तर काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना अधिकार नसतील तर राहुल गांधी यांच्याशी चर्चा करावी लागणार असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर झालेल्या जागा वाटपाच्या बैठकीत संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार आता नाना पटोले यांच्याशी चर्चा करणार नसल्याचे उद्धव ठाकरे गटाने म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App