विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. विरोधात असलेली महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) आणि घटक पक्ष भाजपा आणि महायुती सरकारवर सतत हल्ला चढवत आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, एनसीपी (शरद पवार) आणि शिवसेना (UBT) यांनी रस्त्यावर उतरून विरोध प्रदर्शन केलं. इतकच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निदर्शनं केली.
काँग्रेस आणि मित्र पक्ष मराठा आरक्षण आणि इतर मुद्द्यांना घेऊन राज्यात राजकारण करताना दिसत आहे. या मुद्यांच्या आधारे भाजपाच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काँग्रेस, एनसीपी (शरद पवार) आणि शिवसेना (UBT) यांनी कितीही द्यावे केले तरी राज्यातील जनतेचा मूड काहीतरी वेगळाच आहे. काँग्रेसने कधीही महाराष्ट्राच्या हितांना प्राथमिकता दिली नाही. तसेच राज्यातील अनेक महापुरुषांच्या विरोधात काँग्रेस राहिली असल्याचं जनतेचं मत आहे.
काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच सावरकरांसारख्या प्रमुख नेत्यांचा विरोध केला आहे. जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते. मध्यप्रदेशातील काँग्रेसने बागलकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवला होता. काँग्रेस मुंबई महाराष्ट्राला देण्याच्या देखील विरोधात होती.
शरद पवार यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना विरोध केल्याची टीका त्यांच्यावर केली जाते. तसेच नेहमी काँग्रेसच्या विरोधात असणारे उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीलामांडी लावल्याचं बघायला मिळालं. कॉँग्रेस नेत्यांनीच मंगलोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास विरोध केला होता. इतकच नाही महाविकास आघाडी सरकारने अमरावती आणि दरियापूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हटवले होते. कर्नाटक मधील काँग्रेस नेते सतीश जारकीहोली यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विवादास्पद वक्तव्य केलं होतं. तसेच शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी छत्रपती शिवरायांच्या वंशावळीवर प्रश्न उठवले होते. असेच प्रश्न एनसीपी (शरद पवार) च्या जितेंद्र आव्हाड यांनी देखील उपस्थित केले होते.
जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपती यांच्या विरुद्ध अपमानजनक टिप्पणी केली होती. त्यांनी संभाजीराजे यांच्या रक्ताची चाचणी करण्याचा अजब सल्ला दिला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी औरंगजेबाला श्रद्धांजली वाहणे, त्याची प्रशंसा करणे यांसारख्या चुका केल्या.
या चुका त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत महागात पडू शकतात. सत्ताधारी महायुतीकडून या चुकांचं भांडवल बनवून महाविकास आघाडीला कोंडीत पकडलं जावू शकतं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App