विशेष प्रतिनिधी
मुंबई : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडून दिला.ङ त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे सांगून महायुती मजबूत असल्याचा निर्वाळा दिला.
एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महायुती मजबूत झाल्याचा निर्वाळा बावनकुळे यांनी देखील दिला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याचा मार्ग मोकळा झाल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या.
अर्थातच या सगळ्या बातम्यांमुळे महाविकास आघाडीच्या वस्तादाचा सगळाच डाव फसला. वस्ताद म्हणे, महायुतीतल्या दोन घटक पक्षांना बाजूला सारून आपल्या 10 आमदारांचा पाठिंबा भाजपच्या सरकारला देणार होते. परंतु भाजपने वस्तादांकडे कुठला पाठिंबाच मागितला नाही. शिवाय आज एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट मोदी + शाह यांना महाराष्ट्राचा महायुतीचा मुख्यमंत्री निवडायचे अधिकार असल्याचे मान्य करून टाकले. त्यामुळे वस्तादांचे तथाकथित सगळेच “डाव” कोसळले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडे आता एकच राजकीय कार्यक्रम उरला आहे, तो म्हणजे EVMs विरुद्ध आरडाओरडा करण्याचा. तसेही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी EVMs मोहीम उघडण्याचा निर्णय आधीच जाहीर केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडलेल्या उमेदवारांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पत्रकार परिषद घेऊन EVMs विरुद्ध जोरदार तक्रारी केल्या. जितेंद्र आव्हाड यांनी देखील याच तक्रारी रिपीट केल्या. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हातात सध्या EVMs विरुद्ध आरडाओरडा करण्याचा कार्यक्रम उरल्याचेच सिद्ध झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App