डगमगती राजकीय नाव सावरण्यासाठी महाविकास आघाडीची आज सायंकाळी बैठक; उद्धव ठाकरेंचा सहभाग अपेक्षित


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकार गेल्यानंतर केवळ कागदावर उरलेल्या महाविकास आघाडीची डगमगती राजकीय नाव सावरण्यासाठी आज सायंकाळी बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेनेचा ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे नेते हजर राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने या बैठकीची बातमी झाली आहे.Mahavikas Aghadi meeting this evening to save its shaky political name; Uddhav Thackeray’s participation is expected

उद्धव ठाकरे यांनी कालच आपल्या उरलेल्या 16 आमदारांना शेतकऱ्यांच्या आणि ओल्या दुष्काळाच्या प्रश्नावर विधिमंडळात आक्रमक भूमिका घेण्याच्या आदेश दिले आहेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस हाच पक्ष शिंदे – फडणवीस सरकार विरुद्ध विधिमंडळात आक्रमक दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या आमदारांची संख्या कमी असली तरी आक्रमण कमी पडता कामा नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष घालून आपल्या 16 आमदारांना शिंदे – फडणवीस सरकार विरुद्ध अधिक आक्रमक भूमिका घेण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज सायंकाळी विधिमंडळात बैठक होत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात आणि अन्य वरिष्ठ नेते या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीची कदाचित ही अधिकृतरित्या पहिली बैठक असणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला मुख्यमंत्रीपद न सोडता फक्त वर्षा बंगला सोडला होता. त्या दिवशी वर्षा बंगला सोडण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगल्यावर जाऊन भेटले होते. त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यानंतर शरद पवार आजतागायत उद्धव ठाकरे यांना भेटलेले नाहीत. तसेच महाविकास आघाडीची एकत्र बैठकही झालेली नाही. सुमारे दीड महिन्यानंतर महाविकास आघाडीचे नेते शिंदे फडणवीस सरकार स्थिर होताना आज एकत्र बैठकीत भेटत आहेत. या बैठकीत नेमके काय विचार मंथन होते यावर महाविकास आघाडीचे पुढचे भवितव्य अवलंबून आहे. त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुकीला तोंड देण्यासाठी नेमकी कोणती रणनीती आखायची यावर आजच्या बैठकीत प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे.

आघाडी ही तिन्ही पक्षांची गरज

महाविकास आघाडी ही शिवसेनेचा ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची खरे तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने राजकीय गरज बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी आगामी काळ केंद्रीय तपास संस्था खडतर करू शकतात. प्रफुल्ल पटेल, अजितदादा पवार यांच्यासारखे नेते आधीच केंद्रीय तपास संस्थांच्या स्कॅनर खाली आहेत. त्यांना अटक होण्याची शक्यता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात बोलली जातच आहे. एवढे बडे नेते आत मध्ये गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुझी राजकीय पोकळी निर्माण होईल ती भरून काढणे तसे कठीण आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला महाविकास आघाडीची गरज आहे. शिवसेनेतली फूट अभूतपूर्व आहे. 16 च आमदार उरले आहेत. त्यामुळे शिवसेनेला तशीच आघाडीची गरज आहे. काँग्रेस पूर्ण गल्लीतगात्र आहे. आघाडी ही या पक्षासाठी अपरिहार्यता आहे. त्यामुळे राजकीय अपरिहार्यतेतून आज महाविकास आघाडीचे बैठक होत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Mahavikas Aghadi meeting this evening to save its shaky political name; Uddhav Thackeray’s participation is expected

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात