द्रष्टे उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर; राज्य सरकारची घोषणा


वृत्तसंस्था

मुंबई : नामांकित उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. यासंबंधी राज्य सरकारने घोषणा केली आहे. महाराष्ट्र शासनाने या वर्षापासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचा पहिला मानाचा पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर करण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत याबाबत माहिती दिली.Maharashtra’s first Udyogratna Award announced to visionary industrialist Ratan Tata

बैठकीत झाला निर्णय

महाराष्ट्र भूषण दर्जाचा हा पुरस्कार देण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक झाली. या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. उद्योगरत्न पुरस्कार यंदापासून देण्यात येणार आहे. 

हा पुरस्कार राष्ट्रीय स्तरावरचा

हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार असेल. पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना देण्यात येईल. याशिवाय महिला तसेच मराठी उदयोजक व अन्य एका उद्योजकाला असे तीन पुरसकार देण्यात येतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

देश विकासासाठी रतन टाटांचे मोठे योगदान

महाराष्ट्र भूषण पुरस्कार साहित्य, कला, विज्ञान या क्षेत्रामध्ये अलौकिक कामगिरी करणाऱ्यांना प्रदान करण्यत येतो. याच धर्तीवर यंदापासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्यात येणार आहे. टाटा ग्रुप भारतातील सर्वात जुना आणि सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक आहे. देशाला पुढे नेण्यात रतन टाटा यांचा मोठा वाटा आहे. तसेच टाटा समूहाची मोठी भरभराट रतन टाटा यांनी आपल्या कारकिर्दीत करून दाखवली. आजही रतन टाटा हे टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आहेत. रतन टाटा हे त्यांच्या साधेपणासाठीही प्रसिद्ध आहेत.

Maharashtra’s first Udyogratna Award announced to visionary industrialist Ratan Tata

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*