Maharashtra Violence : हिंसाचाराचे आरोप असलेल्या रझा अकादमीच्या कार्यालयावर छापा; मालेगावची दंगल पूर्वनियोजित होती, आ. मुफ्ती यांचा दावा

बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात त्रिपुरामध्ये झालेल्या निदर्शनेदरम्यान मशिदी जाळण्यात आल्याच्या अफवेवरून महाराष्ट्रात उसळलेल्या हिंसाचारासाठी भाजप रझा अकादमी संस्थेला जबाबदार धरत आहे आणि बंदीची मागणी करत आहे. या पार्श्वभूमीवर आज (17 नोव्हेंबर, बुधवार) मध्यरात्री रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. Maharashtra violence updates as raids on raza academy office over malegaon riots


वृत्तसंस्था

मुंबई : बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात त्रिपुरामध्ये झालेल्या निदर्शनेदरम्यान मशिदी जाळण्यात आल्याच्या अफवेवरून महाराष्ट्रात उसळलेल्या हिंसाचारासाठी भाजप रझा अकादमी संस्थेला जबाबदार धरत आहे आणि बंदीची मागणी करत आहे. या पार्श्वभूमीवर आज (17 नोव्हेंबर, बुधवार) मध्यरात्री रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकून काही कागदपत्रे जप्त केली आहेत.

मालेगावातील रझा अकादमी आणि ऑल इंडिया सुन्नी जमियत उलेमा यांनी बंद पुकारला होता. हजारोंच्या संख्येने रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठा हिंसाचार झाला. दुकाने जाळली. दगडफेक आणि तोडफोडीत लाखोंच्या मालमत्तेचे नुकसान झाले. याप्रकरणी केवळ आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी भाजपकडून सातत्याने होत होती. पोलिसांच्या भूमिकेवर स्थानिक आमदारही प्रश्न उपस्थित करत होते. त्यानंतर आज मध्यरात्री पोलिसांनी रझा अकादमीच्या कार्यालयावर छापा टाकून काही कागदपत्रे जप्त केली.



राष्ट्रवादीचा नेते अयाज हलचल दंगलीचा खरा सूत्रधार?

मालेगावमध्ये झालेला हिंसाचार सुनियोजित होता. अशी वस्तुस्थिती आमदार मौलाना मुफ्ती यांनी समोर आणली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि नगरसेवक अयाज हलचल यांनी आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्रिपुरामध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचे व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तिथं सरकारनं शस्त्र उगारलंय. असे संदेश असलेल्या या क्लिप अन्य चार जणांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड करण्यात आल्या होत्या. ही घटना ८ नोव्हेंबरची आहे. याप्रकरणी पोलिसांनी अयाज हलचलाही अटक केली आहे. इतर 42 जणांवरही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस दंगल घडवणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.

आ. मौलाना मुफ्ती यांचे राष्ट्रवादीच्या अयाजवर गंभीर आरोप

मालेगाव दंगलीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार मौलाना मुफ्ती यांनी केली आहे. ते म्हणाले, “मालेगावमध्ये सुनियोजित पद्धतीने दंगल घडवण्यात आली. आठ दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि नगरसेवक अयाज हलचल यांनी त्रिपुरातील घटनेबाबत बैठक घेतली. चिथावणीखोर भाषणे केली. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

‘रझा अकादमीने लोकांना पैसे वाटले!’

आमदार मौलाना मुफ्ती यांनी आरोप केला की, ‘दंगलीप्रकरणी अटक करण्यात आलेली व्यक्ती राष्ट्रवादीची आहे. एक फरार संशयित जनता दलाचा आहे. मुंबईतील रझा अकादमीच्या काही लोकांनी यासाठी पैसे वाटले. दंगलीच्या आदल्या रात्री दंगलखोरांनी दगड गोळा केले होते. वीस वर्षांपासून मालेगाव शांत आहे. हे सर्व लोकांचे नियोजनबद्ध कृत्य आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांवर दंगल भडकवल्याचा आरोप केला आहे.

Maharashtra violence updates as raids on raza academy office over malegaon riots

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात