विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत मिळवलेला मोठा “अडवांटेज” शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीने अवघ्या चार महिन्यांमध्ये गमावला. मोदींना 400 पार फक्त घटना बदलासाठी करायचे आहे, असे नॅरेटिव्ह लोकसभेच्या वेळी महाराष्ट्रात चालले. परंतु, ते विधानसभा निवडणुकीत फेल गेले. त्याचबरोबर हिंदुत्वाला छेद देण्यासाठी पवार आणि काँग्रेस यांनी जातीपातींमध्ये फूट पाडायचा प्रयत्न केला, पण बटेंगे तो कटेंगे आणि एक रहेंगे तो सेफ रहेंगे या घोषणांनी तो डाव देखील हाणून पाडला. Maharashtra Vidhansabha Election result 2024
महत्त्वाचे म्हणजे नको जाती-पाती, आवडली आम्हाला महायुती असे म्हणत महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी आपल्या घरी लक्ष्मी आणली. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महायुतीने बहुमताचा आकडा केव्हाच ओलांडला असून भाजप 88, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 45, अजितदादांचे राष्ट्रवादी 30 जागांवर आघाडीवर आहे.
महाविकास आघाडी प्रचंड पिछाडीवर पडली असून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 15 काँग्रेस 16 आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना 18 जागांवर आघाडीवर आहे.
अपक्ष आणि छोटे पक्ष 18 जागांवर आघाडीवर आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App