काही काही ठिकाणी तर संपूर्ण कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला आहे.बऱ्याच जणांचं आयुष पूर्णपणे उध्वस्त झाले आहे.Maharashtra: The state government will provide Rs 50,000 to the families of the patients who died due to corona; Information provided by Vijay Vadettiwar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : जगभरासह भारतातही कोरोनाने हाहाकार माजवला होता.दरम्यान आत्ता कोरोनाची दुसरी लत ओसरली असून रुग्ण संख्येचे प्रमाण घटले आहे. परंतू कोरोना महामरिमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.काही काही ठिकाणी तर संपूर्ण कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला आहे.बऱ्याच जणांचं आयुष पूर्णपणे उध्वस्त झाले आहे.
कित्येक मुलांचे मातृ-पितृ छत्र हरपले.दरम्यान आता कोरोना महामारीबाबत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. करोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांना राज्य शासन ५० हजार रुपयांची मदत करणार आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्विट द्वारे माहिती दिली आहे.
वडेट्टीवार म्हणाले की “करोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या निकटतम नातेवाईकांस ५०,०००/- रूपये (रु. पन्नास हजार ) इतका सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमीत करण्यात आला आहे.”
कोरोना ने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या निकटतम नातेवाईकांस ५०,०००/- रूपये (रु. पन्नास हजार ) इतका सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमीत करण्यात आला आहे. (1/3) #COVID19 #maharashtra — Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 26, 2021
कोरोना ने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या निकटतम नातेवाईकांस ५०,०००/- रूपये (रु. पन्नास हजार ) इतका सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.
याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमीत करण्यात आला आहे. (1/3) #COVID19 #maharashtra
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 26, 2021
तसेच, ” ही मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाचे नातेईवाईक राज्य शासना द्वारे विकसित करण्यात येत असलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन, किंवा सेतू केंद्रात, ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकेल.” अशी माहिती देखील वडेट्टीवार यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
महत्वाची बाब म्हणजे आरटीपीसीआर/ मॉलेक्युलर टेस्ट/आरएटी या चाचण्यांमधून ज्या रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता , किंवा जो कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झालेका तसेच ज्या व्यक्तीचे क्लिनिकल डायग्नोसिस कोविड -19 असे झाले होते, त्याच व्यक्तीचे प्रकरण करोना मृत्यू प्रकरणासाठी कोविड प्रकरण म्हणून समजण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App