विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात आता 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी राज्यात 3,295 लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे 3 लाखांहून अधिक जणांना लस देण्यात आली आहे. Maharashtra takes lead in vaccination
एकाच दिवशी 57 हजार जणांना लसीकरण करून पुणे जिल्हा राज्यात अग्रेसर राहीला आहे. त्यापाठोपाठ मुंबईत देखील 50 हजार जणांचे लसीकरण झाले.
महाराष्ट्राने देशभरात सर्वाधिक सुमारे 65 लाखांहून नागरिकांचे लसीकरण करत पहिला क्रमांक अबाधित ठेवला आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दररोज तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून दररोज किमान पावणे तीन लाख नागरिकांना लसीकरण केले जात आहे.
कोरोनाने राज्यात मोठा कहर केला असून त्यामुळे वेगाने होणारे लसीकरण फार महत्वाची बाब बनली आहे. सुरुवातीला राज्यात लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. आता मात्र वाढत्या रुग्ण संख्येमुळे लोकांचा लसीकरणाकडे कल वाढलेला दिसत असल्याचे पहायला मिळते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App