Maharashtra SSC Result 2021 : कोरोना संकटामुळे या वर्षी रद्द झालेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज (16 जुलै) बोर्डाने एसएससी बोर्डाचा (Maharashtra SSC Board Result) निकाल जाहीर केला आहे. यावर्षी राज्याचा निकाल तब्बल 99.95% लागला असल्याचे बोर्डाने सांगितले. यात रिपिटर्सचा निकाल 90.25 % लागला आहे. 9 विभागांमध्ये आणि 8 माध्यमांमध्ये घेतल्या जाणार्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये या वर्षीही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 100% लागला आहे, दुसरीकडे नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी तोही 99.84% लागला आहे. विद्यार्थ्यांना आपले ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजेपासून पाहता येणार आहेत. Maharashtra SSC Result 2021 Know Your 10th Result How to download 10th result
विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरोना संकटामुळे या वर्षी रद्द झालेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज (16 जुलै) बोर्डाने एसएससी बोर्डाचा (Maharashtra SSC Board Result) निकाल जाहीर केला आहे. यावर्षी राज्याचा निकाल तब्बल 99.95% लागला असल्याचे बोर्डाने सांगितले. यात रिपिटर्सचा निकाल 90.25 % लागला आहे. 9 विभागांमध्ये आणि 8 माध्यमांमध्ये घेतल्या जाणार्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये या वर्षीही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 100% लागला आहे, दुसरीकडे नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी तोही 99.84% लागला आहे. विद्यार्थ्यांना आपले ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजेपासून पाहता येणार आहेत.
राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे की, यावर्षी निकालानंतर पुन्हा गुण पडताळण्याची किंवा छायाप्रती घेण्याची मुभा नसेल. विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
एसएससी बोर्डाचा एकूण निकाल – 99.95%
पुणे : ९९.६५ % नागपूर : ९९.८४ % औरंगाबाद : ९९.९६ % मुंबई : ९९.९६ % कोल्हापूर : ९९.९२ % अमरावती : ९९.९८ % नाशिक : ९९.९६ % लातूर : ९९.९६ % कोकण : १०० %
विद्यार्थी : ९,०९,९३१ विद्यार्थिंनी : ७,४८,६९३ एकूण : १६,५८,६२४
एकूण उत्तीर्ण मुली – 99.96% एकूण उत्तीर्ण मुलं – 99.94% 100% निकाल – 27 विषयांचा 90% वर गुण असलेले विद्यार्थी – 5% 100% गुण मिळवलेले विद्यार्थी – 957
http://result.mh-ssc.ac.in http://mahahsscboard.in
एकूण आठ माध्यमानुसार सन 2020-21 वर्षातील एसएससी (इ. १० वी ) परीक्षेला एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी ९ लाख ०९ हजार ९३१ मुलं असून मुलींची संख्या ७ लाख ४८ हजार ६९३ एवढी आहे.
Maharashtra SSC Result 2021 Know Your 10th Result How to download 10th result
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App