suicide over panipuri issue : पुण्यातील एका जोडप्यामध्ये पाणीपुरीवरून कडाडक्याचे भांडण झाले. न सांगताच पतीने पाणीपुरी मागवल्यानंतर त्यांच्यात भांडण झाले. वाद इतका वाढला की पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी पतीविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक्षा सरवदे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिचे पती गहिनीनाथ सरवदे यांना पोलिसांनी सध्या अटक केली आहे. Maharashtra Pune wife commits suicide over panipuri issue
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील एका जोडप्यामध्ये पाणीपुरीवरून कडाडक्याचे भांडण झाले. न सांगताच पतीने पाणीपुरी मागवल्यानंतर त्यांच्यात भांडण झाले. वाद इतका वाढला की पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी पतीविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक्षा सरवदे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिचे पती गहिनीनाथ सरवदे यांना पोलिसांनी सध्या अटक केली आहे.
गहिनीनाथ सरवदे हे मूळचे सोलापूरचे आहेत. 2019 मध्ये त्यांनी प्रतीक्षाशी लग्न केले. त्यांना एक मुलगा आहे. गहिनीनाथ उच्चशिक्षित आहेत आणि एका मोठ्या कंपनीत काम करतात. लग्नापासूनच गहिनीनाथ आणि प्रतीक्षा यांच्यात वाद होत होते. काही दिवसांपूर्वी गहिनीनाथने प्रतीक्षाला पुण्याला बोलावले होते. हे दोघेही आंबेगाव पठार परिसरात राहत होते.
दोन दिवसांपूर्वी कार्यालयातून घरी येत असताना गहिनीनाथ पाणीपुरी पार्सल घेऊन आले. न विचारता त्यांनी पाणीपुरी आणल्याने प्रतीक्षाला राग आला. तिने गहिनीनाथशी वाद सुरू केला. गहिनीनाथ आणि प्रतीक्षामधील वाद वाढला. यानंतर पत्नीने पाणीपुरी खाण्यास नकार दिला. एवढेच नाही, प्रतीक्षाने ऑफिसला जाताना गहिनीनाथला टिफिन देण्यासही नकार दिला. प्रतीक्षाचा राग इतका वाढला की तिने विष खाल्ले. तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शनिवारी दुपारपर्यंत तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. दुपारी तीनच्या सुमारास प्रतीक्षाने अखेरचा श्वास घेतला. यानंतर प्रतीक्षाचे वडील प्रकाश पिसे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात जाऊन गहिनीनाथविरोधात तक्रार दाखल केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Maharashtra Pune wife commits suicide over panipuri issue
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App