महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झाला आहे..तो थांबवण्यासाठी राज उद्धव यांनी एकत्र यावं.

मनसे कडून शिवसेना भवनात बॅनर ..


विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्राच्या राज्यकारणात वर्षभरानंतर पुन्हा एकदा रविवारी मोठ सत्तानाट्य घडलं . आणि राजकीय नाट्याचा चौथा अंक सुरू झाला. गेल्या काही महिन्यात नाराजीची चर्चा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडली आणि विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देत अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम,अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील आदी मंत्र्यांनी ही शपथ घेतली. हे सगळं सुरू असताना. महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील दिगू टिपणीस झाला आहे. अशी बोचरी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटर वरून दिली.

ही प्रतिक्रिया आल्यानंतर राज ठाकरे यांचा या सगळ्या बाबतचा दृष्टिकोन लक्षात आला. आणि मनसेच्या वतीने शिवसेना भवन परिसरात बॅनर बाजिला उधाण आलं. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. आता तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी साद बॅनरच्या माध्यमातून घालण्यात आली आहे.

 



मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले आहेत.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे भाजपाच्या वळचंनीला जातात का ? अशा काहीशा चर्चा होत्या . शिंदे गट आणि भाजप कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी होतं होत्या . मात्र या सत्ता नाट्यानंतर आलेली राज ठाकरे यांची प्रतिक्रिया काहीसं वेगळं सांगून जाते .

येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी खरंच हे दोन भाऊ एकत्र येणार का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय जीनामा देत अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील हसनमुश्री धनंजय मुंडे धर्मराव बाबा आत्राम अदिती तटकरे संजय बनसोडे अनिल पाटील आदी मंत्र्यांनी ही शपथ घेतली .Maharashtra politics, Raj Thakre uddav Thakre

Maharashtra politics, Raj Thakre uddav Thakre

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात