होय, पुन्हा एकदा ‘एफडीआय’मध्ये महाराष्ट्र नंबर 1 !

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती, महाविकास आघाडीवर साधला निशाणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  भारतात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीत म्हणजे एफडीआयमध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३च्या अखेरच्या तिमाहीत महाराष्ट्राने सर्व राज्यांना मागे टाकत परकीय गुंतवणुकीत पहिला क्रमांक पटकवला आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल अनुक्रमे कर्नाटक आणि गुजरातचे स्थान आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देत, प्रतिक्रिया दिली. Maharashtra is Number 1 Again in FDI

देवेंद्र फडणवीस म्हणाले, होय, पुन्हा एकदा ‘एफडीआय’मध्ये महाराष्ट्र नंबर 1 ! आम्ही सातत्याने सांगत होतो की खंडणी, वसुली, भ्रष्टाचाराचा महाविकास आघाडीचा काळ संपवून राज्यात नवे सरकार आले आहे आणि आता महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ वाढणार आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर 1 होणार.’’

याशिवाय, ‘’डीआयपीपीने जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीचा जो अहवाल जारी केला, त्यात पुन्हा एकदा महाराष्ट्र  सर्वाधिक  एफडीआय (परकीय गुंतवणूक) प्राप्त करणारे राज्य ठरले आहे. 29 टक्क्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून, कर्नाटक 24 टक्क्यांसह दुसर्‍या तर गुजरात 17 टक्क्यांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे.’’ असंही फडणवीस यांनी सांगितलं आहे.

Maharashtra is Number 1 Again in FDI

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात