Maharashtra : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, 15 सप्टेंबरपर्यंत मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra

वृत्तसंस्था

मुंबई : Maharashtra बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: 14 आणि 15 सप्टेंबर रोजी कोकण-गोव्यात अतिवृष्टी होण्याचा धोका असून, 15 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही अतिवृष्टीची शक्यता आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढण्याचा आणि शहरी भागांत पाणी साचण्याचा धोका हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.Maharashtra

हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य आणि शेजारील वायव्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या प्रणालीमुळे ओडिशा, आंध्र प्रदेशासह महाराष्ट्रात दमदार पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 14 व 15 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात 13 ते 15 सप्टेंबर या कालावधीत व्यापक पाऊस पडणार आहे.



या काळात वारंवार वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि अल्पावधीत मोठा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनात आणि नागरिकांना वाहतूक व दैनंदिन जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

महाराष्ट्रासाठी सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचा इशारा विशेष महत्त्वाचा आहे. 13 ते 15 सप्टेंबरदरम्यान कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या सर्व भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

कोकण-गोवा : 14 व 15 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीची शक्यता.
मध्य महाराष्ट्र : 15 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी.
मराठवाडा व विदर्भ : 13 ते 15 सप्टेंबरदरम्यान जोरदार सरी.
यामुळे शेतकऱ्यांना पीकसंवर्धनासाठी तातडीने पावले उचलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, नद्यांमध्ये पाण्याचा अचानक वाढलेला प्रवाह, डोंगराळ भागात भूस्खलन आणि शहरांमध्ये पाणी साचण्याचा धोका लक्षात घेता नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा

हवामान विभागाच्या वतीने परभणी जिल्ह्यातील परभणी तालुका, पूर्ण आणि पालम तालुक्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि औंढा तालुक्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे. या भागातील पिंगळी, परभणी ग्रामीण, पूर्णा, कंठेश्वर, पालम, बनवास, पेठशिवणी सर्कलमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हिंगोलीत कळमनुरी, नांदापूर, औंढा, येहळेगाव, सलाणा, जावळा या भागाला देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Heavy Rainfall Warning September

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात