Sextortion Gang : मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एका टोळीचा भंडाफोड केला आहे. या टोळीकडून 100 पेक्षा जास्त ए-लिस्टेड सेलिब्रिटी सेक्सटॉर्शनचे बळी ठरले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीत एक अल्पवयीनही सामील आहे. सायबर सेलच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी सांगितले की, आतापर्यंत या टोळीने 285 जणांना लक्ष्य केले आहे. आता त्यांच्या मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची तपासणी सुरू आहे. पोलिसांनी या आरोपींना महाराष्ट्रातील नागपूर, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि गुजरातमधून अटक केली आहे. maharashtra cyber cell busts sextortion gang in mumbai
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एका टोळीचा भंडाफोड केला आहे. या टोळीकडून 100 पेक्षा जास्त ए-लिस्टेड सेलिब्रिटी सेक्सटॉर्शनचे बळी ठरले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीत एक अल्पवयीनही सामील आहे. सायबर सेलच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी सांगितले की, आतापर्यंत या टोळीने 285 जणांना लक्ष्य केले आहे. आता त्यांच्या मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची तपासणी सुरू आहे. पोलिसांनी या आरोपींना महाराष्ट्रातील नागपूर, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि गुजरातमधून अटक केली आहे.
करंदीकर म्हणाल्या की, आरोपी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट खाती तयार करायचे आणि मुख्यत्वे हाय प्रोफाइल व श्रीमंत मुली आणि पुरुषांना हेरायचे. त्या म्हणाल्या की, आरोपींनी 12 बनावट खाती आणि सहा बनावट ईमेल आयडी तयार केले होते, ज्यांचा वापर लोकांशी मैत्री करण्यासाठी केला जात होता.
आरोपींनी चौकशीदरम्यान असेही म्हटले की, लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांनी सहा- सहा महिन्यांसाठी मैत्री जपली होती आणि एकदा विश्वास जिंकल्यावर ते व्हिडिओला फोन करायचे आणि नंतर त्यांना कपडे काढण्यास सांगितले जायचे. त्यानंतर तो कपडे काढून टार्गेटचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि मग ब्लॅकमेलिंगचे काम सुरू व्हायचे.
या आरोपींनी 100 पेक्षा जास्त ए-लिस्टेड सेलिब्रिटींना लक्ष्य केले आहे. यात प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय या टोळीने महिला आणि पुरुष मॉडेल्सनाही लक्ष्य केले आहे. ही टोळी मुख्यतः इन्स्टाग्रामवर सक्रिय असते, तेथे हे लोक टारगेटला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करायचे.
तपासादरम्यान आरोपींनी पोलिसांना सांगितले की, हे लोक त्या व्हिडिओच्या आधारे टार्गेटला ब्लॅकमेल करून पैसे गोळा करायचे आणि नंतर ते ट्विटरवर डीएमद्वारे ते व्हिडिओ विकत असत. पोलिसांनी सांगितले की, हे लोक ट्विटरवर त्या व्हिडिओचे फोटो पकडत असत. यानंतर ज्यांना ते व्हिडिओ पाहायचे होते, ते त्यांना थेट संदेश पाठवायचे आणि नंतर हे लोक प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी चार्जेस घ्यायचे.
तपासात हेही समोर आले आहे की, आरोपींनी पैशाच्या व्यवहारासाठी नेपाळमधील एका बँकेच्या खात्याचा वापर केला. तपास यंत्रणांचा ससेमिरा चुकवण्यासाठी हे लोक ब्लॅकमेलिंगद्वारे मिळालेले पैसे लपवण्यासाठी नेपाळच्या बँकेचा आधार घेत असत. त्यांना माहिती आहे की, जर पोलिसांना कळले आणि बँक खाते भारताचे असेल तर खाते गोठवले जाईल आणि पैसे मिळणार नाहीत. यामुळे भारताच्या खात्याव्यतिरिक्त या लोकांनी नेपाळ बँक खात्याचाही अवलंब केला, ज्यातून ते त्यांचे सर्व पैसे जमा करायचे. पोलिसांनी आता नेपाळ प्रशासनाला याबाबत माहिती दिली आहे, जेणेकरून त्या बँकेच्या खात्याचा तपशील मिळू शकेल.
maharashtra cyber cell busts sextortion gang in mumbai
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App