प्रतिनिधी
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघात ज्यांच्या राजकीय खेळीने मोठा राजकीय ट्विस्टला ते तीन वेळेचे पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार डॉ. सुधीर तांबे यांना अखेर काँग्रेस पक्षाने निलंबित केले आहे. काँग्रेसने त्यांची चौथ्यांदा उमेदवारी जाहीर करून त्यांच्या नावाचा ए बी फॉर्म देऊन देखील त्यांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करण्यापेक्षा आपला मुलगा सत्यजित तांबे याचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून घेतला. या राजकीय खेळीत काँग्रेस पक्षाची नाचक्की झाली. त्यामुळे काँग्रेसने संबंधित सर्व प्रकरणाची चौकशी करून डॉ. सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित केले आहे. Maharashtra Congress suspends MLC Sudhir Thambe from the party.
नाशिक पदवीधर मतदारसंघात आता पक्षीय लढतीपेक्षा अपक्ष उमेदवारांच्या पाठिंब्याच्या मुद्द्यावरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडीचे घटक पक्ष अशी लढत रंगली आहे. कारण एकीकडे काँग्रेस मधून फुटून अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या सत्यजित तांबे यांच्या पाठीशी भाजप उभा राहण्याची शक्यता आहे, तर त्याचवेळी भाजपकडून ज्यांना उमेदवारीची अपेक्षा होती त्या सुषमा पाटील शिवसेनेच्या ठाकरे गटात दाखल झाल्याने महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी उभी राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे प्रत्यक्षात परस्पर विरोधी गटांमध्ये असलेले नेते आपापल्या पक्षात बंडखोरी करून विरोधी गटात गेल्याची अनोखी राजकीय खेळी आपोआप घडली आहे.
आता त्यातून भाजप आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष कोणता मार्ग काढतात आणि एकमेकांवर मात करण्याचा कसा प्रयत्न करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र काँग्रेसच्या नेत्यांना डिवचून घेतले आहे. आधी अजितदादांनी आपण बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांना आधीच नाशिकमध्ये काही वेगळे शिजत असलेले सांगितले होते, असे म्हटले आहे, तर आज शरद पवारांनी पुण्यात मोदी बाग निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाशिक विधान परिषद निवडणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाने पाठिंबा बाबत महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची आधी चर्चा करायला हवी होती, असे टोचून घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App