• Download App
    CM Fadnavis Trilingual Formula Final Decision Stakeholders त्रिभाषा सूत्रासंदर्भात वर्षावर आढावा बैठक

    CM Fadnavis : त्रिभाषा सूत्रासंदर्भात वर्षावर आढावा बैठक; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय

    CM Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : CM Fadnavis त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक बैठक आज रात्री पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि शिक्षण विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.CM Fadnavis

    राज्य सरकारने 17 जून रोजी शुद्धीपत्रक प्रसिद्ध करत शालेय शिक्षणात तिसरी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला, आणि त्यानंतर राज्यभरातून या धोरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सर्वप्रथम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट सरकारला आव्हान दिले. तिसरी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय आम्ही मान्य करणार नाही. सरकारने हे आमचे आव्हान समजावे, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी सरकारला इशारा दिला. केवळ मनसेच नव्हे तर मराठी अभ्यास केंद्राकडूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात आक्षेप नोंदवण्यात आला आहे.



    समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय

    एकीकडे शासनाच्या या निर्णयाला विरोध वाढत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना तातडीने बोलवून वर्षा निवासस्थानावर बैठक घेतली. बैठकीत या विषयावर सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सर्व राज्यांची स्थिती सर्वांसमोर मांडावी, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी मुलांचे अॅकडेमिक बँक ऑफ क्रेडिटच्या अनुषंगाने नुकसान होऊ नये, यासह इतरही पर्यायांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

    सल्लामसलतीची प्रक्रिया झाल्यावरच निर्णय

    मराठी भाषेचे अभ्यासक, साहित्यिक, राजकीय नेते यासह सर्व संबंधितांसमोर याचे सादरीकरण आणि सल्लामसलतीची प्रक्रिया राबविण्यात यावी, असे या बैठकीत ठरले. ही सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे आता पुढची सल्लामसलतीची प्रक्रिया प्रारंभ करणार आहेत.

    या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार हे उपस्थित होते.

    CM Fadnavis Trilingual Formula Final Decision Stakeholders

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!