CM Fadnavis : मी शिव्याप्रूफ, पण महाराष्ट्राला बदनाम कराल तर सोडणार नाही- मुख्यमंत्री:पुणे-मुंबई मिसिंग लिंक बंदप्रकरणी टीका करणाऱ्यांना इशारा
दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे दरड कोसळून पुणे-मुंबई मिसिंग लिंक रस्ता बंद झाला होता. तो १९ तासांनंतर खुला झाला. हजारो कोटी रुपये खर्चूनही रस्ता बंद झालाच कसा, असा सवाल विरोधकांनी केला. रस्ता खुला झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी काही विरोधकांनी रस्ता बंद असल्याचे सांगितले. त्याला विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, माझ्यावर वैयक्तिक चिखलफेक करा, मी ‘शिव्याप्रूफ’ आहे; पण महाराष्ट्राला बदनाम कराल तर मी सोडणार नाही.