विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे दरड कोसळून पुणे-मुंबई मिसिंग लिंक रस्ता बंद झाला होता. तो १९ तासांनंतर खुला झाला. हजारो कोटी रुपये खर्चूनही रस्ता बंद झालाच कसा, असा सवाल विरोधकांनी केला. रस्ता खुला झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी काही विरोधकांनी रस्ता बंद असल्याचे सांगितले. त्याला विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, माझ्यावर वैयक्तिक चिखलफेक करा, मी ‘शिव्याप्रूफ’ आहे; पण महाराष्ट्राला बदनाम कराल तर मी सोडणार नाही.CM Fadnavis
निर्णयक्षमता आणि ऐतिहासिक दाखले
प्रकल्पाच्या उभारणीचा दाखला देत फडणवीस म्हणाले की, “आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दोन पानांची नोट लिहून १४ कारणं देत मिसिंग लिंकची फाइल बंद केली. पण आम्ही हा प्रकल्प उभारणीचा धाडसी निर्णय घेतला. दरडीच्या भीतीने विकासकामेच करायचे नाही का, असा सवाल करताना त्यांनी कोकण रेल्वेचे उदाहरण दिले.CM Fadnavis
तंत्रज्ञानाची झेप आणि कोट्यवधींची बचत
मुंबई मनपात फुगवलेल्या दराच्या १०३२ कोटी रुपयांच्या संशयास्पद निविदा रद्द करण्यात आल्या, तसेच शालेय वस्तू खरेदीत ४८ कोटींची बचत झाली. याशिवाय, रखडलेला गारगाई प्रकल्प वन विभागाची मंजुरी आणून मार्गी लावला असून, वाटाघाटीद्वारे त्यात २७० कोटींची बचत केली आहे. मुंबईतील खड्डे बुजवण्याचा पालिकेचा खर्च २०२३ मधील २०३ कोटींवरून २०२६ मध्ये अवघा ४५ कोटी रुपयांवर आला आहे, असेही ते म्हणाले.
डिझास्टर मॅनमुळे प्रत्युत्तर
भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले की, मिसिंग लिंकप्रकरणी टीका करताना विरोधक मेगा प्रोजेक्ट राबवणाऱ्या अधिकारी, अभियंत्यांचे नीतीधैर्य खचवत होते. शिवाय मुख्यमंत्र्यांची इन्फ्रा मॅन ही प्रतिमा मोडून त्यांना डिझास्टर मॅन असे सोशल मिडीयावर म्हणत होते. त्यामुळेही फडणवीसांनी आक्रमक होऊन विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
I Am Abuse-Proof, But Won’t Tolerate Defamation of Maharashtra: CM Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- पिनाका लांब पल्ल्याच्या गाईडेड रॉकेटची अचूक माऱ्याची चाचणी यशस्वी; सीमेपार दहशतवाद्यांचे अड्डे टार्गेट करणे सोपे!!
- अमरनाथ यात्रेत घातपाताचा संशय; तीन संशयीतांना फेशियल रेकग्निशन कॅमेऱ्यावरून ओळखून अटक!!
- भाजपची रणनीती : ठाकरेंच्या फुटीर नेत्यांना सत्तेचे गाजर; पण पवारांच्या सगळ्या नेत्यांना सत्तेचे मृगजळ!!
- सशक्त लोकशाहीत संवाद साधण्याखेरीज दुसरे करणार तरी काय??