NDA चा विस्तार होताच महाराष्ट्र भाजप निवडणुकीला सज्ज; 70 जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर!!


प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDA अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विस्तार होताच महाराष्ट्रात देखील भाजपने पक्ष विस्तारासाठी मोठी राजकीय हलचाल केली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 70 नव्या जिल्हाध्यक्षांची टीम जाहीर केली आहे. यात धीरज घाटे, अभय आगरकर यांच्या सारख्या जुन्या कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली आहे.Maharashtra BJP ready for elections as NDA expands; New team of 70 district presidents announced!! चंद्रशेखर बावनकुळे यांचे ट्विट :

भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत.

भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे. सर्वांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

Maharashtra BJP ready for elections as NDA expands; New team of 70 district presidents announced!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात