विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपने महाराष्ट्रातली पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर करताना फारसे राजकीय प्रयोग केले नव्हते. त्याचेच रिपिटेशन दुसऱ्या 22 जणांच्या यादीत आज केले. भाजपने बहुतांश विद्यमान आमदारांवरच विश्वास टाकला. त्याचबरोबर पराभूतांवर देखील विश्वास ठेवत त्यांना उमेदवारी दिली. मायक्रो प्लॅनिंगच्या बळावर निवडणूक लढवताना भाजपने शक्यतो नवे प्रयोग टाळून अनुभवी नेत्यांनाच उमेदवारी दिली आहे.
पहिल्या यादीमध्ये भाजपने 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आता भाजपकडून 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पहिली आणि दुसरी यादी मिळून एकूण 121 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. गोपीचंद पडळकरांना जतमधून तिकीट देण्यात आले आहे, तर देवयानी फरांदे यांना नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
Congress काँग्रेसच्या यादीत राहुल गांधींनी घातले लक्ष, 100 पेक्षा कमी नाहीच, ठरवले लक्ष्य!!
भाजपच्या दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे 1. पुणे कॅन्टोन्मेंट – सुनील कांबळे 2. कसबा – हेमंत रासने 3. लातूर ग्रामीण – रमेश कराड ‘ 4. उल्हासनगर – कुमार आयलानी 5. शिराळा – सत्यजित देशमुख 6. धुळे ग्रामीण – राम भदाणे 7. मलकापूर – चैनसुख संचेती 8. अकोला पश्चिम – विजय अग्रवाल 9. ब्रह्मपुरी – कृष्णलाल सहारे 10. वाशिम – श्याम खोडे 11. खडकवासला – भीमराव तापकीर 12. जत – गोपीचंद पडळकर 13. अकोट – प्रकाश भारसाखले 14. मेलघाट – केवलराम काळे 15. नाशिक मध्य – देवयानी फरांदे 16. पंढरपूर – समाधान आवताडे 17. वरोरा – करण देवतळे 18. विक्रमगड – हरिश्चंद्र भोये 19. सोलापूर शहर मध्य – देवेंद्र कोठे 20. राजुरा – देवराव भोंगळे 21. गडचिरोली – मिलिंद नरोटे 22. पेण – रवींद्र पाटील
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App