प्रतिनिधी
मुंबई : पित्यानंतर पुत्राचाही त्याच तोलामोलाचा सन्मान करण्याचा योगायोग महाराष्ट्र शासनाने साधला आहे. ज्येष्ठ निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना सन २००८ मध्ये त्यावेळच्या विलासराव देशमुख सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. आता २०२३ मध्ये नानासाहेबांचे सुपत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देखील याच महाराष्ट भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचा योगायोग शिंदे – फडणवीस सरकारने साधला आहे. maharashtra bhushan award announced for appasaheb dharmadhikari
नानासाहेब धर्माधिकारी यांनी रुजवलेल्या समाजकार्याच्या रोपट्याचा वटवृक्ष करण्याचे कार्य आप्पासाहेबांनी केले आहे. त्यांचे हेच कार्य त्यांचे चिरंजीव आणि नानासाहेबांचे नातू सचिनदादा धर्माधिकारी करत आहेत. नानासाहेबांच्या प्रेरणेतून दासबोधावरील श्रवण बैठका महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात होत आहेतच, शिवाय देशातील सर्व राज्ये आणि जगातील बहुतांश देशात हे कार्य सुरू आहे. अध्यात्म क्षेत्रात कार्यरत असतानाच सामाजिक कार्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलेले वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन याची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे. शिवाय रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियाने, स्मशानभूमी आणि कब्रस्थानांची स्वच्छता, विहिरींमधील गाळ काढून स्वच्छ करणे, यासह अनेक कामे या आपल्या संस्थेच्या माध्यमातून केली आहेत. या महान कार्याचा सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या रूपाने शिंदे – फडणवीस सरकारने केला आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी ज्येष्ठ निरुपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांनाही यापूर्व याच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यावेळी नानासाहेबांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला होता. तो आप्पासाहेबांनी स्वीकारला होता. २००८ मध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला होता. या सोहळ्याच्या वेळी खारघर येथील 510 एकराच्या परिसरात 40 लाखांहून अधिक लोक जमा झाले होते. गर्दीच्या या उच्चांकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये 2010 मध्ये नोंदही करण्यात आली होती.
आता नानासाहेबांचे चिरंजीव आप्पासाहेब यांनाही हाच महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मानपत्र आणि २५ लाख रूपये असे या पुरस्काराचे नवे स्वरूप आहे. २०२३ पासूनच या पुरस्काराची रक्कम १० लाखांवरून २५ लाख रूपये करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App