विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या १० दिवसांच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड आणि राष्ट्रवादीचे मंत्री अनिल देशमुख यांच्या विकेट गेल्या. आता ठाकरे – पवार सरकार घेत असलेल्या विधिमंडळाच्या दोनच दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या विकेट पडणार का…??, याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. maharashtra assembly mansoon session; ajit pawar and anil parab playing on very sticky wikect; on sharp target of BJP
ठाकरे –पवार सरकार हे अधिवेशन दोनच दिवसांमध्ये गुंडाळणार असले, तरी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीपासून ते अजित पवारांच्या निकटवर्तीयांवरील ईडीची कारवाई, सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत लाटलेल्या रकमा, तसेच अनिल परब यांचे वसूली प्रकरण यावरून सरकारची कोंडी करण्याची रणनीती भाजपने आखली असून, भाजप कार्यसमितीच्या बैठकीत अजित पवार आणि अनिल परब यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
विशेष म्हणजे, हे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्यानंतर पुढे २४ तासांत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर शुगर मिल्स या खासगी कंपनीची मालमत्ता जप्त केली. या कारवाईमुळे अजित पवार अडचणीत आल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे. शिवाय अद्याप या प्रकरणात शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियाही आलेल्या नाहीत.
त्यामुळे अजित पवारांच्या कुटुंबीयांशी संबंधित कारवाईवरून पवार पिता – कन्येचे राजकीय मौन पुरेसे सूचक आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जरंडेश्वर बरोबर आणखी ९ साखर कारखाने ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्यावर नजीकच्या भविष्यात कारवायांची मालिका लागेल. हे सगळे कारखाने राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संबंधित आहेत. त्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोन्ही नेते काहीही बोलायला तयार नाहीत, असे एका वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App