हा पंकजा ताईंच्या शक्ती आणि युक्तीचा कार्यक्रम आहे.आमदार खासदार मिळतो पण नेता मिळत नाही.तसेच नेत्याला सांभाळणं हे आपलं काम आहे. Mahadev Jankar: We do not beg for power; Pankaja is your mother, Pankaja Tai, if your helicopter did not fly, will there be MLAs here?
विशेष प्रतिनिधी
बीड : माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी सावरगावातील भगवान भक्तिगडावर जोरदार टीका केली आहे. जानकर म्हणाले की हा मेळावा राजकीय नाही. हा पंकजा ताईंच्या शक्ती आणि युक्तीचा कार्यक्रम आहे.आमदार खासदार मिळतो पण नेता मिळत नाही.तसेच नेत्याला सांभाळणं हे आपलं काम आहे.
पुढे जानकर म्हणाले की , गोपीनाथ मुंडेंनी वंचितांची मोट बांधली. त्या पंकजा मुंडेच्या पाठी खंबीर राहा. मंत्री येतो आणि जातो. पण नेता कधी मरत नसतो. पंकजा यांचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर इथे आमदार खासदार तरी होतील का, असा सवाल महादेव जानकर यांनी केला.
जानकर यांनी सांगितली पंकजा मुंडेंची आठवण
जानकर म्हणाले आम्ही सत्तेसाठी भीक मागत नाही. सत्ता येईल आणि जाईल पण. आम्ही गद्दार होणार नाही, आम्ही लाचार होणार नाही. सत्ता येईल जाईल पण नेता कधी मरू देऊ नका. हा महादेव जानकर मेला तरी चालेल पण हा महादेव जानकर तुझी साथ कधीच सोडणार नाही पंकजाताई.
आपली पंकजा ताई वाघासारखी नेता
पंकजा मुंडेंनी काय केलं मंत्री सोडून द्या, या देशाचा कारवा कसा चालवावा हे पंकजांनीच दाखवून दिलं. एखादा मुलगा मेला तरी चालेल आई मरता कामा नये. पंकजा मुंडेही आपली आई आहे.लोकं हेमामाालिनीचा मुखवटा लावून येतील पण ती तुमची आई होणार नाही. ती बाई असू शकेल. पंकजा ही आई आहे. ती म्हणते त्यांना निवडून द्या.
Mahadev Jankar: We do not beg for power; Pankaja is your mother, Pankaja Tai, if your helicopter did not fly, will there be MLAs here?
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App