
विशेष प्रतिनिधी
सातारा : अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होत असताना देशात आणि परदेशात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. देशभरातील आणि परदेशातील करोडो मंदिरांमध्ये महापूजा महाआरत्यांचे आयोजन करण्यात आले. अशीच महाआरती समर्थ रामदास स्वामी स्थापित चाफळच्या राम मंदिरात करण्यात आली ही महाआरती छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे छत्रपती यांनी आज केली. यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे मंत्री शंभूराज देसाई हे देखील होते.Maha Aarti by Chhatrapati Udayanaraje, Shambhuraj Desai in the Ram Temple established in the power of Chaphal!!
अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याबरोबर चाफळच्याही राम मंदिरात आनंद उत्सव करण्यात आला या आनंदोत्सवात उदयनराजे, शंभूराजे देसाई यांच्यासह हजारो रामभक्त सहभागी झाले. यावेळी रामनामाचा प्रचंड जयघोष करण्यात आला.
चाफळचे राम मंदिर श्री समर्थांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीसह 1648 मध्ये बांधले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील दानधर्म केल्याचा उल्लेख सनदेमध्ये आहे. याच मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयन महाराज यांनी आज महाआरती केली.
Maha Aarti by Chhatrapati Udayanaraje, Shambhuraj Desai in the Ram Temple established in the power of Chaphal!!
महत्वाच्या बातम्या
- अवकाशातून कशी दिसते रामनगरी अयोध्या, ISROने दाखवल्या सॅटेलाइट इमेजेस; शरयू नदीसह दशरथ महालाचेही दर्शन
- प्राणप्रतिष्ठेआधी मुकेश अंबानींचे घर अँटिलिया झाले राममय, सुंदर फोटोज आले समोर
- राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र, महात्मा गांधींचा केला उल्लेख
- पश्चिम महाराष्ट्रातला “राम संपर्काचा” आकडा खरे तर पवार गटाला धडकी भरवणारा, पण तो गट नुसताच वाजवतोय तोंडाचा बेंडबाजा!!