विशेष प्रतिनिधी
पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनाच भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या अपेक्षांवर पाणी पडले आहे.
भारतीय जनता पक्षाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये पुण्यातील दोन जागांचा समावेश आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदारांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पर्वतीतून माधुरी मिसाळ तर शिवाजीनगर मधून सिद्धार्थ शिरोळे यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. पर्वतीतून श्रीनाथ भिमाले इच्छुक होते. सर्वाधिक उत्सुकता असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला इथेही भाजपचे विद्यमान आमदार आहेत. मात्र येथील उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही.
महाराष्ट्र राज्य कंत्राटी महामंडळ अध्यक्षपद मिळूनही श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती मतदारसंघातून दावेदारी कायम ठेवली होती. मिसाळ यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. मला विधिमंडळात जायचंय महामंडळात नाही, असे ते म्हणाले होते.
दोन दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते, मला आजही भाजपकडून उमेदवारी मिळण्याची आशा आहे. महामंडळावर नियुक्तीबद्दल कोणतेही पत्र मिळालेलं नाही. कोणत्याही नेत्याने देखील सांगितलं नाही. प्रसिद्धी माध्यमांमधून ही बातमी कळाली निवडणूक लढण्याची माझी पूर्ण तयारी झालेली आहे. पर्वतीत मी लढणार आणि जिंकणार हा नारा कायम आहे. गेली पंधरा वर्षांपासून मागणी करत असून यंदा लढण्याची पूर्ण तयारी झालीय. पर्वती विधानसभा मतदारसंघात माधुरी मिसाळ सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. मात्र माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती मतदारसंघावर दावा केला आहे. लढणार आणि जिंकणार म्हणत मोठ्या प्रमाणावर नारेबाजी सुरू केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App