दाखल केलेल्या तक्रारीमध्ये सपनासोबत या कार्यक्रमाचे आयोजक जुनैद अहमद, नवीन शर्मा, किवद अली, अमित पांडे, रत्नाकर उपाध्याय यांचाही उल्लेख करण्यात आला होता.Lucknow court issues arrest warrant against Sapna Chaudhary; The hearing will be held on November 22
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हरियाणामधील सुप्रसिद्ध डान्सर सपना चौधरीचे जगभरात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. चाहत्यांच्या नजरेत सपना तिच्या डान्स आणि अदांमुळे नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी सपना एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे.सपना विरोधात १४ ऑक्टोबर २०१८ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
सपनावर डान्सचा कार्यक्रम रद्द करण्याचा आणि तिकिटांचे पैसे परत न केल्याचा आरोप आहे.आता याप्रकरणात लखनऊ कोर्टाने सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे.
दाखल केलेल्या तक्रारीमध्ये सपनासोबत या कार्यक्रमाचे आयोजक जुनैद अहमद, नवीन शर्मा, किवद अली, अमित पांडे, रत्नाकर उपाध्याय यांचाही उल्लेख करण्यात आला होता.
या कारणामुळे आता सपनाच्या अडचणीत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे. अॅडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट शांतनू त्यागी यांनी वॉरंट जारी केलं असून त्याची सुनावणी २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App