टीआरपीच्या खेळात मालिका अपयशी ठरल्याने ती ऐतिहासिक मालिका घेणार निरोप. अभिनेत्रीची भावनिक पोस्ट चर्चेत .


विशेष प्रतिनिधी

पुणे : टेलिव्हिजन विश्वातील मालिकांचे गणित हे टीआरपी वर अवलंबून असतं. सध्याच्या या डेली सोप च्या जीवघेण्या स्पर्धेत टिकण्यासाठी टीआरपी च गणित जुळून यावं लागतं. विषय किती तगडा असला आणि स्टारकास्ट किती चांगली असली तरीही कधी कधी टीआरपीमुळे मालिका बंद करायची वेळ निर्मात्यावर येते . Lokmanya serial closed because of TRP ..

अशीच काहीशी वेळ झी मराठीवरील लोकमान्य या मालिकेवर आली आहे.काही महिन्यांपूर्वी लोकमान्य टिळक यांच्या आयुष्यावर बेतलेली ‘लोकमान्य’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. पण आता टीआरपीच्या मुद्द्यावरून ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.ब्रिटिशांविरुद्ध अजन्म लढा देत, मंडालयाच्या तुरुंगात गीतारहस्य हा ग्रंथ लिहिणारे आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचीं आयुष्य गाथा सांगणारी झी मराठी या वाहिनीवरील लोकमान्य ही मालिका टीआरपीचं गणित जमत नसल्याने बंद करण्यात येत आहे.

नुकतीच या मालिकेत लोकमान्य टिळक यांच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आणि कवयत्री स्पृहा जोशी हिने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक भावनिक कविता शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

टीआरपीमुळं अनेक मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला जातोय. लोकमान्य टिळक यांच्या आयुष्यावर बेतलेली ‘लोकमान्य’ ही मालिका निरोप घेणार आहे. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,’ अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची ऐतिहासिक चरित्रगाथा ‘लोकमान्य’ या मालिकेतून मांडण्यात येतेय. या मालिकेच्या निमित्तानं टिळकांचा इतिहास प्रेक्षकांना बघायला मिळतोय. पण टीआरपी मिळत नसल्यानं ही मालिका आता बंद होतेय. या मालिकेत स्पृहा जोशी देखील मुख्य भूमिकेत आहे. मालिका निरोप घेत असल्यानंही ती देखील भावुक झाली आहे.

मालिकेत स्पृहा जोशीनं लोकमान्य टिळक यांच्या पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका साकारली आहे. तिचं या भूमिकेसाठी कौतुकही झालं. मात्र टीआरपीच्या स्पर्धेत मात्र ही मालिका मागे पडली. त्यामुळं वाहिनीनं मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला.

स्पृहानं अगदी मोजक्या शब्दांत तिच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल खूप खूप आभार, भामे… असं म्हणत तिनं एक छोटीशी कविताही शेअर केली आहे.

स्वप्नात स्वप्न.. भासात भास
सुवर्ण मृग.. अलगद फास
नाटकात नाटक.. तळ्यात चंद्र
वारा झपताल.. सप्तक मंद्र
पायी पैंजण.. भवताल कुंपण
तुझ्यात मी.. माझ्यात तू …
अमर्याद एकटेपण..

Lokmanya serial closed because of TRP ..

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात