Jan Vishwas Bill : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘जनविश्वास’ विधेयकाला मिळाली मंजुरी!

An all-party meeting will be held on November 28 before the winter session of Parliament

किरकोळ अपराधांना गुन्ह्यांच्या श्रेणीतून मुक्त  केले जाणार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी जनविश्वास (तरतुदींमध्ये सुधारणा) विधेयक, 2023 ला मंजुरी दिली. किरकोळ गुन्ह्यांना गुन्ह्यांच्या श्रेणीतून मुक्त करण्यासाठी जनविश्वास विधेयक आणण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. Jan Vishwas Bill  The Jan Vishwas  Bill was approved in the Union Cabinet meeting

आज हे विधेयक मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी आले होते. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी गेल्या वर्षी 22 डिसेंबर रोजी लोकसभेत जन विश्वास (तरतुदींमध्ये सुधारणा) विधेयक सादर केले होते. त्यानंतर हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले.

या समितीने सर्व १९ मंत्रालये आणि विभागांसह कायदे विभाग यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. समितीने मार्चमध्ये अहवाल स्वीकारला, जो त्याच महिन्यात राज्यसभा आणि लोकसभेसमोर ठेवण्यात आला होता. संसदीय पॅनेलने केंद्राला सूचित केले होते की राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना व्यवसाय सुलभ करण्यासाठी आणि राहणीमान सुलभ करण्याच्या दृष्टीकोनातून जनविश्वास विधेयकाच्या धर्तीवर किरकोळ गुन्ह्यांना गुन्ह्यांच्या श्रेणीतून मुक्त करण्यासाठी राज्य व केंद्रशासित प्रोत्साहित करण्याचा सल्ला दिला होता.

Jan Vishwas Bill  The Jan Vishwas  Bill was approved in the Union Cabinet meeting

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात