वृत्तसंस्था
पुणे : मुंबई प्रमाणे पुण्यामध्येही लोकलसेवा सुरु करावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे. सुमारे दीड वर्षांपासून लोकलसेवा बंदच आहे. त्यामुळे अनेकांना प्रवासासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.Like Mumbai, the demand for local Train services in Pune also increased; The service has been closed for a year and a half
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये पुणे-लोणावळा उपनगरीय लोकलसेवा बंद करण्यात आली होती.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत १५ ऑगस्टपासून लोकलसेवा सामान्यांसाठी बहाल करण्याची घोषणा नुकतीच केली. त्याच धर्तीवर पुण्यात लोकलसेवा सुरु करावी, अशी जोर धरु लागली आहे.
सुमारे दीड वर्षांहून अधिक काळ पुणे-लोणावळ उपनगरीय लोकलसेवा बंद आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून मुंबईत लोकलच्या प्रवासाला परवानगी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर पुणे-लोणावळा आणि पुणे-दौंड मार्गावरील सेवाही पुन्हा सुरू करण्याच्या मागणीला जोर आला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर २० टक्के फेऱ्या सुरू करून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा दिली आहे. त्यानंतर अन्य प्रवाशांना या सेवेला लाभ मिळालेला नाही.
रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या गाड्या सर्वासाठी सुरू आहेत. परंतु लोकल सेवेचे काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबतचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारकडे असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने मुंबईबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा उपनगरीय वाहतुकीसह पुणे-दौंड, पुणे-बारामती आदी मार्गावरील लोकल सेवा सुरू करण्याची मागणी वाढत आहे.
पुणे-लोणावळा लोकलच्या चाळीसहून अधिक फेऱ्या होतात. विद्यार्थी, कामगार, व्यापारी आदी वर्गासाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. दररोज एक लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेत होते. सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांतील निर्बंध शिथिल केले आहेत.महाविद्यालये बंद असली, तरी कामगार आणि व्यापारी वर्गाला या सवेची अत्यंत गरज आहे.
प्रवासासाठी आर्थिक भुर्दंड
पुणे-लोणावळा किंवा पुणे-दौंड या मार्गावरून पुण्यात रोज येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. पुणे ते लोणावला या प्रवासाचे रेल्वेचे तिकीट २० रुपये आहे. या एकेरी प्रवासासाठी सध्या ६० रुपयांहून अधिकची रक्कम मोजावी लागते. त्यामुळे रोजचा प्रवास करणाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App