दक्षिण कोकणसह दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी

विशेष प्रतिनिधी

पुणे : मुंबई आणि नवी मुंबई भागात अंशत: ढगाळ वातावरण आणि काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दक्षिण कोकणसह दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरींची नोंद करण्यात आली. कोकणात अवकाळी पावसाने धुमाकूळ आहे. Light showers in South Central Maharashtra including South Konkan

महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त व्यक्त केली जात आहे. राजधानी मुंबईमध्ये प्रचंड उकाडा जाणवायला सुरूवात झाली आहे. पुढील पाच दिवस वातावरण असेच कोरडे असेल आणि किमान पुढील दोन दिवस तरी वातावरणात फारसा बदल होणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



पुणे वेध शाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट उसळली आहे. गोवा, कोकण, आणि उत्तर महाराष्ट्राला उष्ण तापमानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्राला उन्हाच्या झळा बसण्याचा अंदाज आहे. विदर्भात उष्णतेची लाट आणि मारा होण्याचा इशाराही हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

दुसरीकडे, बंगालच्या खाडीमध्ये पुन्हा एकदा चक्रीवादळ धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असानी नावाचे हे चक्रीवादळ असून दक्षिण-पूर्व बंगालच्या खाडीत हे चक्रीवादळ तयार झाले आहे. यामुळे आज अंदमान-निकोबारसह काही भागात मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. हे चक्रीवादळ ताशी ६५ ते ७५ किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहण्याची शक्‍यता असल्याने समुद्र किनारपट्टीला हाय अलर्ट देण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत एनडीआरएफला अलर्ट दिला आहे.

Light showers in South Central Maharashtra including South Konkan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात