वृत्तसंस्था
पुणे : कोरोनाविरोधातील मॅच जिंकण्यासाठी कोरोनाची चाचणी गरजेची आहे. त्यामुळे उपचाराचा मार्ग त्वरित मोकळा होईल, असे मत क्रिकेटपटू हरभजन सिंगने व्यक्त केले.Let’s win the match against Corona: Harbhajan Singh;BJP inaugurates Corona test van in Pune
भाजपतर्फे पुण्यातील नागरिकांच्या आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यासाठी फिरत्या कोरोना चाचणी व्हॅनचे उदघाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह महेश करपे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ऑनलाईन कार्यक्रमात हरभजनसिंग बोलत होता.
पाटील म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट वेगळी आहे. कोरोनाची टेस्ट केल्याने लवकर निदान होऊन वेळीच उपचार होतील. कामगार तसेच कर्मचाऱ्यांना टेस्ट करण्यासाठी सांगितले आहे.
त्यामुळे लॅबवर ताण वाढला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी टेस्ट वाढवाव्या लागतील. त्यामुळे कोरोना चाचणी व्हॅनची संकल्पना राबविण्यात येत आहे. हरभजनसिंग यांनी व्हॅन उपलब्ध करून दिली.
शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, अंगावर दुखणे काढल्यामुळे काहींना थेट अतिदक्षता विभागात (आयसीयु) दाखल करावे लागत आहे. त्यामुळे त्वरित टेस्ट करा. व्हॅनच्या माध्यमातून जास्तीतजास्त टेस्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे धोका टाळता येईल. रुग्णसंख्या वाढत असल्याने टेस्टचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे.
फिरत्या चाचणी व्हॅनचे वैशिष्ट्य
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App