विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी कठोर भाषेत ठाकरे गटाला झोडपलेLet’s arrange for Rede Mokat left in Mumbai; Thackeray – Fadnavis aggressive against Raut
मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, त्यांचा बंदोबस्त करण्याची आधुनिक योजना असेल तर आम्हाला सुचवा, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये विरोधकांना लगावला. देवेंद्र फडणवीस यांचा रोख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर होता. कारण ठाकरे गटाच्या नेत्यांनी काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात अशीच आक्रमक भाषा वापरून महायुती सरकारवर हल्लाबोल केला होता. उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब यांनी शिंदे फडणवीसांच्या सरकारसह राहुल नार्वेकरांवर आरोपाच्या फैरी झाल्या होत्या आज फडणवीसांनी त्याचे कराडमध्ये उट्टे काढले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कृषी प्रदर्शनात 42 लाख रुपयांचा बैल आला आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक बैलही असून सर्वात छोटी गायदेखील आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मुंबईत काही रेडे मोकाट सुटले आहेत, ते टीव्हीवर बोलत असतात. त्यांचा बंदोबस्त करण्याची काही आधुनिक योजना असेल तर आम्हाला सूचवा, अशी फटकेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
साताऱ्यातील कराडमध्ये आज कृष्णा कृषी आणि औद्योगिक महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. मुंबईतील मोकाट रेड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तुमच्याकडे काही तंत्रज्ञान आले असेल तर सुचवा, असे व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांना उद्देशून म्हटले.
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घ्यावी, असं आवाहनही देवेंद्र फडणवीसांनी केलं असून सातारा जिल्ह्यात पुढील काळात दुष्काळ हे नावही राहणार नाही. त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आम्ही हाती घेतलीयं. त्यासाठी फीडर सौरवर आणत असून त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज अखंडितपणे देता येणार आहे. शेतकऱ्यांना ही सोलरची वीज 3 रुपयांत देत आहोत. हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प शेतकऱ्यांसाठी हाती घेत असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App