प्रतिनिधी
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणूकीत भाजपने तिकिट कापण्याच्या मुद्दयावरून नाराज झालेल्या पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादांच्या पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे.Legislative Council (No) Candidature: Pankaja Munde will explain to supporters even after Chandrakant Dada’s warning ??
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराडांच्या कार्यालयावर चाल करून जाणारे आणि प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवणारे जर पंकजा मुंडेंचे समर्थक असतील तर पंकजा यांच्या आगामी कारकिर्दीला यामुळे फटका बसू शकतो हे त्यांनी लक्षात घ्यावे. यापुढे संघटनेत अशा गोष्टी सहन करणार नाही. त्यांनी आपल्या समर्थकांना समजून सांगावे, अशा स्पष्ट शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंना समज दिली आहे.
आता अशी समज दिल्यानंतर पंकजा मुंडे आपल्या समर्थकांना समजावून सांगून आवर घालणार की उघडपणे बंडाचा पवित्रा घेणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ते कार्यकर्ते नेमके कोण?
भागवत कराडांच्या कार्यालयावर चाल करून जाणारे आणि प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवणारे कार्यकर्ते नेमके कोण होते?,असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
अनेक अपक्ष आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांना विधान परिषदेला भाजपला मतदान करू असे सांगितले आहे. यावेळी ओपन मतदान होते. यामुळे यावेळी मतदान करता आले नाही, मात्र येणाऱ्या निवडणुकीत भाजपला साथ देणार आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सत्ता असताना ती नीट संभाळता येत नाही, आणि ईडी हातात असती तर देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केले असते, असे म्हणाऱ्यांना “नाचता येईना अन् अंगण वाकडे” अशी महाविकास आघाडीची परिस्थिती आहे. सरकार विरोधी आमदारांना रुपया देत नाही, आणि मोठ मोठ्या गप्पा मारते असा टोला त्यांनी लगावला आहे. नुसत्या घोषणा करणारे हे सकार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेचा गैरवापर करते. त्यांचा काही फायदा झाला नाही. या विरोधात मी हायकोर्टात जाणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
– पंकजा मुंडेंना सुनावले
भागवत कराडांच्या कार्यालयावर हल्ला करणारे नेमके कोण आहे. हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र जर पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी जर प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवला असेल आणि कराडांच्या ऑफीसवर हल्ला केला असेल तर पंकजा मुंडेंच्या आगामी कारकिर्दीला यामुळे फटका बसू शकतो हे त्यांनी लक्षात घ्यावे. यापुढे संघटनेत अशा गोष्टी सहन करणार नाही. पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना समजून सांगावे असेही त्यांनी अशा शब्दांत पंकजा मुंडेंना सुनावले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App