वृत्तसंस्था
पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेसाठी बाजारात हापूस आंब्यांची मोठी आवक झाली आहे. किरकोळ बाजारात एक डझन हापूस आंब्यांची विक्री ३०० ते ७०० रुपयांनी होत आहे. यामध्ये कर्नाटक ,रत्नागिरी हापूसचा समावेश आहे.Large inflow of hapus mango for Akshayya Tritiya; Pune market flourished; 300 to 700 rupees a dozen
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग परिसरातून हापूसची मोठी आवक होत आहे. फळबाजारात मंगळवारी तीन ते साडेतीन हजार पेट्यांची आवक झाली.
कच्च्या हापूसच्या चार ते सहा डझनाच्या पेटीला एक ते अडीच हजार रुपये तसेच पाच ते दहा डझनाच्या पेटीला दीड हजार ते चार हजार रुपये असा भाव मिळाला.
चार ते सहा डझनाच्या तयार हापूसच्या पेटीची दीड ते तीन हजार रुपये आणि पाच ते दहा डझनाच्या तयार हापूसच्या पेटीची दोन ते पाच हजार हजार रुपये दराने विक्री झाली.
महात्मा फुले मंडईतील बाजारात आंबा खरेदीसाठी गर्दी होत आहे. शनिपार, मंडई परिसरात किरकोळ विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत.
कर्नाटक हापूसची आवक वाढली
कर्नाटकातून वीस ते पंचवीस हजार पेट्यांची आवक झाली.कर्नाटक हापूसच्या चार डझनाच्या तयार आंब्यांच्या पेटीचे दर ८०० ते १५०० रुपये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App