नबाब मलिक यांनी ट्विट केलेला संवादाचा स्क्रीनशॉट फेक, क्रांती रेडकर यांची सायबर सेलकडे तक्रार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांचा नावाने असलेल्या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. मात्र तो संवाद खोटा असल्याचे सांगत रेडकर यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.Kranti Redkar’s complaint to Cyber Cell, Fake screenshot of the dialogue tweeted by Nabab Malik

मलिक यांनी ट्वीट करीत शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये क्रांती रेडकर आणि कॅप्टन जॅक नावाच्या व्यक्तीमधील संभाषण आहे. यात कॅप्टन जॅक स्पॅरो नावाची व्यक्ती आपल्याकडे नवाब मलिक आणि दाऊद यांचा फोटो असल्याचे सांगते. यावर क्रांती रेडकर तो फोटो आपल्याला मिळाल्यास त्याबदल्यात बक्षीस मिळेल असे सांगते.



पुढे ती व्यक्ती क्रांतीला एक फोटो पाठविते ज्यामध्ये राज बब्बर आणि नवाब मलिक दिसत आहेत. क्रांती रेडकर रागाने हा राज बब्बर असल्याचे म्हणते. यावर ती व्यक्ती सांगते की, राज बब्बरची पत्नी त्याला लाडाने दाऊद म्हणते.

याला क्रांती रेडकर यांनी उत्तर देताना, हे चॅट फेक असल्याचे म्हटले आहे. याबाबत त्यांनी सायबर सेलकडे तक्रार केली आहे. एका ट्विटर हँडलने माझे खोटे खाते तयार करून एक बनावट चॅट तयार केले. त्या खोट्या खात्यासाठी त्याने माझा फोटो प्रोफाइल फोटो म्हणून वापरला आहे. मलिक यांनी खातरजमा न करता या बनावट चॅटचा स्क्रीनशॉट त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केला, असे तक्रारीत म्हटले आहे.

क्रांती रेडकर यांनी म्हटले आहे की, नवाब मलिक यांनी शेअर केलेल्या चॅटचा स्क्रीनशॉट हा मिम्सचा भाग आहे आणि तो एडिट केला आहे. हे खूप दु:खद असून, हे प्रकरण एवढ्या मोठ्या थराला जाईल, असे वाटले नव्हते..

Kranti Redkar’s complaint to Cyber Cell, Fake screenshot of the dialogue tweeted by Nabab Malik

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात