विशेष प्रतिनिधी
मुंबई : आर्यन खान क्रुज ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर लाचखोरीचा आरोप झाल्यानंतर त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर प्रथमच आपल्या पतीच्या समर्थनासाठी उतरली आहे. Kranti Redkar landed in support of her husband Sameer Wankhede; Said, Satyamev wins !! The Almighty saves the swimmer against the current !!
तिने सत्यमेव जयते असे ट्विट करून समीर वानखेंडेंचे समर्थन केले आहे. “जेव्हा तुम्ही लाटेच्या विरुद्ध दिशेने पोहता, तेव्हा तुम्ही बुडू शकता. पण जर तुम्ही सर्वशक्तिमान अर्थात परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा असेल, तर मात्र जगातील कोणतीही लाट तुम्हाला बुडवू शकत नाही. कारण सत्य हे फक्त त्या परमेश्वरालाच माहिती असते. शुभ सकाळ, सत्यमेव जयते,” असे ट्विट क्रांतीने काही तासांपूर्वी केले आहे. तिच्या या ट्विटवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याचे वडील अभिनेता शाहरूख खान यांच्याकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील आठ कोटी रुपये ‘एनसीबी’चे संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप ‘एनसीबी’चे पंच प्रभाकर साईल यांनी केला आहे.
When you swim against the tide , it may drown you, but if the almighty is with you , no tide this is world is big enough to drown you. Because , only HE 👆🏻knows the truth 🙏🙏🙏 good morning . SATYAMEV JAYATE. — KRANTI REDKAR WANKHEDE (@KrantiRedkar) October 25, 2021
When you swim against the tide , it may drown you, but if the almighty is with you , no tide this is world is big enough to drown you. Because , only HE 👆🏻knows the truth 🙏🙏🙏 good morning . SATYAMEV JAYATE.
— KRANTI REDKAR WANKHEDE (@KrantiRedkar) October 25, 2021
तर प्रभाकर साईल यांचे प्रतिज्ञापत्र समाज माध्यमांवरून आपल्या निदर्शनास आल्याचे ‘एनसीबी’चे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी सांगितले. प्रभाकर या प्रकरणात साक्षीदार असल्यामुळे त्यांनी हे प्रतिज्ञापत्र समाज माध्यमांऐवजी न्यायालयात सादर करावे. प्रतिज्ञापत्रात त्यांनी एका व्यक्ती विरोधात आरोप केले आहेत. पण समीर वानखेडे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. काही आरोप पैसे मागण्याच्या संदर्भातील आहेत. त्यामुळे आपण हे प्रतिज्ञापत्र कार्यवाहीसाठी ‘एनसीबी’च्या महासंचालकांना पाठवत असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App