परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे समन्स, साक्षीसाठी हजर राहण्याचे आदेश


विशेष प्रतिनिधी

पुणे : कोरेगाव भीमा हिंचासाचार प्रकरणात चौकशीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या आयोगाच्या कामजाला सुरुवात झाली आहे. कोरेगाव भीमी हिंसाचार प्रकरणामध्ये तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमबीर सिंह आणि तत्कालीन पुण्याचे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची साक्ष महत्त्वाची असल्याने त्यांना समन्स बजावण्याचे आदेश कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने दिले असल्याची माहिती आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी दिली.Koregaon Bhima Inquiry Commission summons Parambir Singh and Rashmi Shukla to appear as witnesses

आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी या संदर्भात अर्ज केला होता. कोरेगाव भीमा हिंसाचार घडला त्यावेळी परमबिर सिंह हे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) व रश्मी शुक्ला हे पुणे पोलीस आयुक्त होते.हिंसाचाराच्या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडील इंटेलिजन्स इनपुट व इतर माहिती महत्वाची असल्याने, त्यांची साक्ष आवश्यक असल्याचे आशिष सातपुते यांनी म्हटले. सातपुते यांचा अर्ज मंजूर करताना आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे एन पटेल यांनी परामबीर आणि रश्मी शुक्ला याना समन्स जारी करण्याचे आदेश दिले आहेत.

एक जानेवारी 2018 रोजी पुण्यातील कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता. तर 10 पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते. पुण्यात भरवण्यात आलेली एल्गार परिषद व त्यातील चिथावणीखोर भाषणांमुळे कोरेगाव भीमा हिंसाचार उसळल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्या प्रकरणी अनेक जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा आयोग नेमला होता.

Koregaon Bhima Inquiry Commission summons Parambir Singh and Rashmi Shukla to appear as witnesses

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*