पुणे : मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कार्यक्रम ‘ढोलकीच्या तालावर’ हा गेल्या काही दिवासांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. उत्कृष्ट लावणी नृत्यांगनांनी यावेळी ‘ढोलकीच्या तालावर’चं पर्व चांगले रंगतदार केले. कलर्स मराठीवरील या शोने सर्वानाच थिरकायला भाग पाडले. ‘ढोलकीच्या तालावर’चा महाअंतिम सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. Konkan Kanya Neha :
पेणची नेहा पाटील हिने ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर आपलं नावं कोरलं. नेहाने पहिल्या दिवसापासूनच तिच्या उत्तम नृत्याने आणि मनमोहक अदाकारीनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. अखेर तिने मेहनतीने आणि दमदार नृत्य कौशल्याने हा सन्मान मिळवला.
View this post on Instagram A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)
A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)
तर 12 मुलींमध्ये आत्मविश्वासाने आणि तितक्याच कौशल्याने लावणी सादर करणारा शुभम बोराडे हा या सिझनचा उपविजेता ठरला. नम्रता सांगुळे ही या कार्यक्रमाची द्वितीय उपविजेती ठरली.टॉप स्पर्धकांमध्ये शुभम बोराडे आणि नेहा पाटील , समता आमणे, नम्रता सांगुळे, पूर्वा साळेकर, तनुजा शिंदे यांनी मजल मारली होती. या सहा स्पर्धकांनी दमदार लावणी करत एकमेकांना चांगलीच टक्कर दिली होती. यात शेवटी पण यात शुभम बोराडे, नम्रता सांगुळे आणि नेहा पाटील यांनी बाजी मारली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App