विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : जकात आणि एलबीटी बंद झाल्यानंतर कोल्हापूरमधील महानगरपालिकेचे पैसे मिळवून देणारे विभाग म्हणजे घरफाळा आणि नगररचना विभाग हे आहेत. परंतु सध्या या दोन विभागांच्या कामकाजाबद्दल अनेक तक्रारी येत आहेत. या विभागांमध्ये लोक परवानगी मागायला येतात तसेच शुल्क भरायला येतात. पण काम करण्याची वृत्ती नसल्यामुळे महानगर पालिकेच्या उत्पन्नाला खीळ बसली आहे की काय असेच चित्र सध्या दिसत आहे.
Kolhapur: The impact of the management of the town planning department on the income of the Municipal Corporation
महानगरपालिकेतील नगररचना विभागाच्या कारभारावर बऱ्याच वेळा बोट ठेवले जाते. अशा वेळी कमी अधिकारी, कमी कर्मचारी ही कारणे पुढे केली जातात. पण जेव्हा बाकीचे विभाग उत्तमरीत्या काम करत आहेत तर नगररचना विभागाच्या कामकाजावर मात्र प्रश्नचिन्ह उभे राहते.
कोल्हापूर आरटीओ विभाग प्रायव्हेट बसेस वर करणार कारवाई
महानगर पालिकेच्या नगररचना विभागाच्या लाल फितीतील कारभाराचा फटका महापालिकेच्या उत्पन्नाला बसत आहे. सध्या घरफाळा आणि नगररचना विभाग या दोन्ही विभागांतील कामकाजामध्ये गोंधळाचे वातावरण आहे. नगररचना विभागाच्या कार्यालयात गेल्यानंतर तेथे ज्याचे काम पूर्ण झाले आहे असा एकही माणूस सापडत नाही. माजी महापौर, माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, ज्येष्ठ आर्किटेक्चर यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनाही आपल्या काम पूर्ण करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. धडपड करून एखादे अधिकारी भेटले तर तुमचे काम नक्की करतो एवढेच आश्वासन मात्र ते निघून जातात. असे चिन्ह सध्या महानगरपालिकेमध्ये बघायला मिळते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App