कोल्हापूर आरटीओ विभाग प्रायव्हेट बसेस वर करणार कारवाई


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. नुकताच सांगली मधील एका कर्मचार्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा वाढता तणाव असा आरोप करत सरकारला या बाबतीत जबाबदार धरले आहे.

Kolhapur RTO will take action on private buses

बुधवारी कोल्हापूर बसस्थानकावर सदानंद सखाराम कांबळे या गगनबावडा डेपोट मधील कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नशिबाने एका व्यक्तीने त्याला पाहिले आणि आत्महत्या करण्यापासून रोखले. त्याचप्रमाणे येथे एसटी कर्मचार्यांनी जागर आणि गोंधळ यासारख्या धार्मिक विधी देखील पार पाडले आहेत. सरकारला लवकरात लवकर जाग यावी आणि कोणता तरी ठोस निर्णय घेतला जावा अशी त्यांची मागणी आहे.


एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करतांना वाहन नोंदणी करणं गरजेचं; जाणून घ्या RTO चे नियम


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रायव्हेट बसचे दर मात्र गगनाला भिडले आहेत. नेहमीच्या रेट पेक्षा डबल रेटने प्रवाशांकडे शुल्क आकारले जात आहे. सचिन जाधव हा पुण्यातील आयटी कंपनीत काम करणारा व्यक्ती सांगतो की, मागील दोन दिवसांपासून मी पुण्याला जाण्याचा प्रयत्न करत आहे. पण दर इतके वाढले आहेत की नेहमीच्या दरापेक्षा ते तीनपट आहेत. त्यामुळे मी बाइकने पुण्याला जाण्याचे प्रेफर करेल. तसेच आरटीओने प्रायव्हेट बसेसवर वाढलेल्या किमतीच्या संदर्भात अॅक्शन घेण्याचे ठरवले आहे.

Kolhapur RTO will take action on private buses

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात