एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करतांना वाहन नोंदणी करणं गरजेचं; जाणून घ्या RTO चे नियम

जर आपण लांब कालावधीसाठी एका परिवहन कार्यलयाच्या हद्दीतून दुसऱ्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीत जात असु किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राहायला जाणार आहोत तर आपल्या वाहनाला तिथे नोंदणीकृत करून घेणे गरजेचे आहे .Vehicle registration is required when migrating from one state to another; Learn the rules of RTO


विशेष प्रतिनिधी

नागपूर : प्रत्येकाला आपल्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनाची परिवहन विभागाकडे (आरटीओ) नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतर परिवहन विभाग प्रत्येक वाहनाला एक विशिष्ट वाहन क्रमांक बहाल करतो. त्या विशिष्ट्य वाहन क्रमांकाने आपण आवश्यक परवाने घेऊन देशात कुठेही फिरायला जाऊ शकतो.

मात्र, जेव्हा आपण स्थलांतरण/बदली किंवा इतर कारणाने आपलं वाहन नोंदणीकृत असलेल्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीतून ( उदाहरण MH 31) दुसऱ्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीत जातो. तेव्हा मात्र आपल्याला काही प्रशासकीय सोपस्कार करावे लागतात.

 •  सर्वात आधी आपल्याला ज्या आरटीओ कार्यालयाच्या हद्दीत आपले वाहन नोंदणीकृत आहे. तिथून एक “एनओसी” घ्यावी लागते.
  ती “एनओसी” ज्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीत आपल्याला जायचे आहे. त्या कार्यालयात जाऊन द्यावी लागते.
 • त्यानंतर जर नव्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीतले आपले वास्तव्य एक वर्षापर्यंतचे असेल तर वाहन मालक म्हणून आपल्याला “फॉर्मल ट्रान्स्फर” म्हणजेच “एफटी डिक्लेरेशन” करावे लागते.
 • त्यासाठी त्या वाहनासाठीचे रोड टॅक्स आणि इतर शुल्क भरावे लागते. ते केल्यानंतर आपण आपल्या मूळ वाहन नोंदणी क्रमांकावरच त्या नव्या ठिकाणी वाहन चालवू शकतो.
 • मात्र, जर दुसऱ्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीतले आपले वास्तव्य एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असणार असेल तर फॉर्मल ट्रान्स्फरच्या प्रक्रियेऐवजी आपल्या “रिएसाईन्डमेन्ट ऑफ मायग्रेटेड व्हेईकल” म्हणजेच “आरएमए डिक्लेरेशन” करावे लागते.
 • या प्रक्रियेत ही आपल्याला आपल्या वाहनासाठीचे रोड टॅक्स आणि इतर शुल्क भरावे लागतात.
 • आरएमए डिक्लेरेशन”च्या बाबतीत रोड टॅक्स व इतर शुल्क भरल्यानंतर आपल्याला वाहनाला त्या नव्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीतले नवे वाहन नोंदणी क्रमांक मिळते.

जोपर्यंत आपण त्या नव्या ठिकाणी असतो, तोवर आपल्याला ते नवे वाहन नोंदणी क्रमांक उपलब्ध असतात. मात्र, विशिष्ट कालावधी नंतर आपण जेव्हा आपल्या मूळ ठिकाणी परततो, तेव्हा आपल्याला आपले जुने वाहन नोंदणी क्रमांक मिळते. या स्थितीत आपण नव्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीत भरलेले रोड टॅक्स आपल्याला रिफंड भरल्यानंतर 10 टक्के कपात करून परत मिळू शकते.

Vehicle registration is required when migrating from one state to another; Learn the rules of RTO

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*