विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे माफियांची मदत करतात. त्यामुळे ते 19 बंगल्याप्रकरणी भाष्य करत नाहीत,असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.Kirit Somaiya’s allegation that Uddhav Thackeray and Sharad Pawar are helping the mafia
सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सोमय्या म्हणाले, आज आपण राज्यपालांची भेट घेतली असून, अलिबाग मधील वनविभागाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या 19 बंगल्याची चौकशी घ्यायला हवी. उद्धव ठाकरे या बंगल्याप्रकरणी एक शब्दही बोलत नाहीत.
त्यामुळे आपण या सर्व 19 बंगल्यांचा गौडबंगाल राज्यपालांना सांगितले.नवाब मलिकांना असे वाटले की, आमच्यापर्यंत कोणी पोहोचवू शकत नाही. मात्र आता मलिकांचे कारस्थान जनतेसमोर येत आहेत.
त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. सोमय्यांना ही सर्व माहिती कोण देते हेच सगळे विचारतात, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App