प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने चौकशी केलेले राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची वाट अनिल देशमुखांच्या दिशेने जेल कडे चालली आहे, असा हल्लाबोल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना संदर्भातल्या घोटाळा आहे यामध्ये किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अनिल देशमुख यांना देखील घेरले आहे. Kirit Somaiya says, Prajakt Tanpure transfer Ram Ganesh Gadkari Sugar Mill to Anil Deshmukh ED take action against him
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची काल ईडीकडून (ED) चौकशी करण्यात आली होती. याविषयी बोलताना किरीट सोमय्यांनी प्राजक्त तनपुरे हे अनिल देशुख यांच्या वाटेवर असून त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे म्हटले आहे
ठाकरे – पवार सरकारमधील मंत्र्यांचे, नेत्यांचे अनेक घोटाळाचे उद्योग बाहेर येत आहेत. यशवंत जाधव, अजित पवार, अनिल परब आणि प्राजक्त तनपुरे यांच्यावर कारवाई होणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे ईडी चौकशीला उपस्थित राहिल्याबद्दल विचारले असता किरीट सोमय्या म्हणाले, की शरद पवार काय करू शकतात हे राज्याच्या जनतेला कळेल. लाखो शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने एनसीपीच्या नेत्यांच्या नावाने वळवण्यात आले. राम गणेश गडकरी साखर कारखाना प्राजक्त तनपुरेंच्या नावाने ट्रान्सफर करण्यात आला. 100 कोटीची संपत्ती 13 कोटीत दिली गेली तीच संपत्ती तनपुरे यांनी अनिल देशमुख यांना पास ऑन केली. त्यामुळेच प्राजक्त तनपुरे हे अनिल देशमुखांच्या वाटेवर असून त्यांच्यावरही कारवाई होणार आहे.
शरद पवारांच्या आशीर्वादानं अनिल देशमुख यांनी बेनामी पद्धतीने प्राजक्त तनपुरे यांच्याद्वारे राम गणेश गडकरी साखर कारखाना काबीज केला, त्याचे पुरावे बाहेर आले आहेत. त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे लाडके , पण त्यांच्या रिसॉर्टचा एनए/ गैरकृषी परवाना हा ठाकरे – पवब सरकारनेच रद्द केला. म्हणजे हा रिसॉर्ट अवैध होता. परवाना अवैध पद्धतीने मिळवला होता, असे किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App