सोमय्यांविरोधात अनिल परब यांनी १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला असून मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी सोमय्यांना समन्स बजावले आहेत.Kirit Somaiya is present! Somaiya will have to appear in court on December 23, the High Court Registry summons Somaiya
विशेष प्रतिनिधी
मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांची ट्विटर तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेली बदनामी भाजपच्या माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अंगलट आली आहे. सोमय्यांविरोधात अनिल परब यांनी १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला असून मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी सोमय्यांना समन्स बजावले आहेत.
न्यायालयाने त्यांना २३ डिसेंबरला सकाळी ११ वाजता स्वतः जातीने हजर राहण्याचे आदेश दिले असून, त्यावेळी सोमय्यांना भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.
किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीसह शिवसेनेच्या काही मंत्र्यांवर टीका करत घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांना लक्ष्य करत सोमय्यांनी त्यांच्यावर घोटाळ्याचा आळ घेत त्यांची बदनामी केली.
सोमय्या यांच्या बदनामीकारक आणि अर्थहीन ट्विटमुळे आपली नाचक्की व मानहानी झाली असल्याने सर्व ट्विट डिलिट करण्यात यावे तसेच बिनशर्त माफी मागावी यासाठी परब यांनी सोमय्या यांना १४ सप्टेंबर रोजी नोटीस पाठवली होती. ७२ तासांचा अल्टीमेटमही नोटीसीतून देण्यात आला होता.
परंतु सोमय्या यांनी माफी न मागितल्यामुळे अनिल परब यांनी ऍड. सुषमा सिंग यांच्या मार्फत उच्च न्यायालयात सोमय्यांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. या दाव्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या प्रोनोटरी विभागाने किरीट सोमय्या यांना आज समन्स बजावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App