LEGEND LAL BAHADUR SHASTRI : जय जवान-जय किसान ! लाल बहादूर शास्त्रीजी अमर रहे ! १९६५ युद्ध-भारताचा विजय -पाकिस्तानला धूळ चारणार्या पंतप्रधानांचा संशयास्पद मृत्यू


  • शास्त्री’ हा शब्द ‘लाल बहादूर’ च्या नावाचा पर्याय बनला. लाल बहादूर शास्त्रींनी ‘मरू नका, मारा’ असा नारा दिला ज्यामुळे देशभरात क्रांती झाली.

  • त्यांनी दिलेला आणखी एक नारा ‘जय जवान-जय किसान’ अजूनही लोकांच्या जिभेवर आहे.

  • शास्त्रीजींची कारकिर्द : लाल बहादूर शास्त्रींनी 9 जून 1964 रोजी भारताचे दुसरे पंतप्रधान आणि तिसरे परराष्ट्रमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. 17 जुलै 1964 रोजी त्यांनी आपल्या परराष्ट्रमंत्रीपदाचा राजीनामा दिला. LEGEND LAL BAHADUR SHASTRI: Jai Jawan-Jai Kisan! Lal Bahadur Shastriji is immortal! 1965 War – India’s victory – Suspicious death of PM who dusted off Pakistan

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना आजही त्यांच्या साधेपणाबद्दल ओळखले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन देशाच्या सर्वोच्चपदी पोहोचलेल्या शास्त्री यांनी आयुष्यभर साधेपणा जपला.

भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 मध्ये उत्तरप्रदेशातील ‘मुगलसराय’ या ठिकाणी एका कायस्थ कुटुंबात मुंशी शारदा प्रसाद श्रीवास्तव यांच्याकडे झाला.

त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते, त्यासाठी त्यांना सगळे ‘मुंशी’ म्हणत होते. शास्त्रींच्या आईचं नाव रामदुलारी होतं. हे आपल्या कुटुंबातील सर्वात लहान असल्यामुळे त्यांना ‘नन्हें’ म्हणायचे. ते फार लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. ते आपल्या आईबरोबर त्यांच्या आजोळी गेले अन् तिथेच त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी हरिश्चंद्र हायस्कूल आणि काशी विद्यापीठातून शिक्षण घेतलं. काशी विद्यापीठातून त्यांना ‘शास्त्री’ची पदवी मिळाली. त्यांनी आपले जातिसंज्ञा असलेले श्रीवास्तव नेहमीसाठी काढून टाकलं अन् आणि शास्त्री उपनाव लावलं. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री नावानं ते ओळखले जावू लागले.

1965 : युद्धात भारताचा पाकिस्तानावर ‘विजय’

  • लाल बहादूर शास्त्री यांच्याच कार्यकाळात भारत आणि पाकिस्तान दरम्यान दुसरं युद्ध झालं होतं. हे ‘काश्मीर युद्ध’ भारत-पाक दरम्यानचे पहिलं हवाई युद्ध म्हणून ओळखलं जातं. यात भारतानं पाकवर विजय मिळविला होता. ही शास्त्रीजींच्या कारकिर्दीत देशातील सर्वोच्च कामगिरी होती.
  • त्यावेळी भारतीय लष्कराने भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेल्या आदेशाचे पालन केले. त्यांनी पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला आणि दुहेरी हल्ला चढवला.
  • इतिहासात पहिल्यांदाच भारतीय लष्कराने केवळ आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली नाही तर मेजर जनरल प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली लाहोरवर हल्ला केला.
  • शास्त्रींची रणनीती सियालकोट आणि लाहोरवर हल्ला करण्याची होती. 
  • सांगायचे तर शास्त्रीजींनी अहिंसेवर विश्वास ठेवला पण आपली मातृभूमी सर्वांपेक्षा वर ठेवली. म्हणून त्याच्या संरक्षणासाठी शत्रूंना मारणे देखील स्वीकार्य होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या लढाच्या कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले. त्यांनी 1921 मध्ये असहकार चळवळीत, 1930 दांडी मार्च आणि 1942 भारत छोडो आंदोलनात प्रामुख्याने भाग घेतला. त्यांनी ‘मरो नाही मारो’ चा नारा दिला. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांना देशाचे पंतप्रधान केले गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर 1952 च्या निवडणुकीत ते लोकसभेवर नि वडून आले आणि रेल्वे मंत्री झाले. नंतर 1961 मध्ये ते गृहमंत्री झाले. 9 जून 1964 पासून ते भारताचे पंतप्रधान झाले.

ताश्कंद करार आणि शास्त्रीजींचा संशयास्पद मृत्यू

सन 1960 पर्यंत सोव्हिएत युनियन भारताचा सर्वात मोठा लष्करी सामग्री पुरवणारा देश होता. 1965 च्या युद्धानंतर 10 जानेवारी 1966 रोजी रशियाच्या मध्यस्थीनं भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि पाकचे जनरल अयुब खान यांच्यात ताश्कंदमध्ये (तत्कालीन सोव्हियत संघ, आत्ताचा उझबेकिस्तान) एक बैठक पार पडली. या बैठकीत पाकचा 710 चौकिमीचा प्रदेश भारताला, तर भारताचा 210 चौकिमी प्रदेश पाकला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच, 11 जानेवारी 1966 रोजी शास्त्रींचा ताश्कंदमध्ये संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हृदयविकाराचे दोन झटके आल्यानं झाल्याचा पहिल्यांदा सांगितलं गेलं.

1966 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. आजही संपूर्ण भारत शास्त्रीजींना त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणासाठी आठवतो.

LEGEND LAL BAHADUR SHASTRI : Jai Jawan-Jai Kisan! Lal Bahadur Shastriji is immortal! 1965 War – India’s victory – Suspicious death of PM who dusted off Pakistan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात