वृत्तसंस्था
मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 वाजता किंवा नऊ वाजेनंतर भरवाव्यात, असे आदेश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या वतीने परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे शाळांना आता चौथी पर्यंतच्या वर्गाचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे.Kindergarten to 4th classes in the state should be filled after 9 am,Circular issued by the State Govt
राज्यपाल म्हणाले होते- शाळांचा वेळ बदलावा
राज्यपाल रमेश बैस यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात सांगितले होते की, आजकाल लोकांच्या जीवनशैली बदलली आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली बदलल्याने घरातील लहान मुलांवर देखील त्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे सकाळी सकाळी मुलांना झोपेतून उठवून शाळेत पाठवणे तसे अवघड झाले. परिणामी मुलांची झोप होत नाही. त्यामुळे मानसिक आजारांना देखील सामोरे जावे लागत आहे, असे सांगत त्यांनी लहान मुलांच्या शाळांची वेळ ही सकाळी न करता त्याचा कालावधी वाढवला पाहिजे, उशीरा शाळा सुरू केल्या पाहिजे, अशी सूचना केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App