विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे आमदार सुरेश आण्णा धस यांचा पंटर खोक्या उर्फ सतीश भोसले याला पोलिसांनी अखेर प्रयागराज मध्ये जाऊन अटक केली. खोक्या टीव्ही चॅनेलला मुलाखती देत होता पण पोलिसांना सापडत नव्हता. टीव्ही चॅनलच्या मुलाखतीत आपण लवकरच पोलिसांना शरण येऊ असे खोक्या म्हणाला होता. वाल्मीक कराड सारखाच तो शरण आला असता तर महाराष्ट्र पोलिसांची पुरती नाचक्की झाली असती. पण खोक्या भोसले शरण येण्यापूर्वीच पोलिसांनी उत्तर प्रदेश मधल्या प्रयागराज मध्ये जाऊन खोक्याच्या मुसक्या आवळल्या. Khokya Bhosle
बीड मधल्या राजकीय जांगडगुत्त्यातून एक एक प्रकरणे बाहेर येत असताना खोक्या भोसलेचे प्रकरण बाहेर आले. त्याने मस्तीखोरीतून केलेली मारहाण, गाडीच्या डॅशबोर्ड वर उधळलेले पैसे, त्याने केलेल्या हरणांच्या शिकारी हे सगळे बाहेर आले. त्यामुळे संतोष देशमुख + धनंजय मुंडे + वाल्मीक कराड प्रकरणामध्ये फ्रंट फूटवर खेळत असलेले सुरेश आण्णा धस बॅकफूटवर गेले. खोक्या भोसलेशी त्यांचे असलेले संबंध त्यांना कबूल करावे लागले. पोलीस आणि कायदा खोक्या भोसले विषयी काय तो निर्णय घेतील, असे सांगून सुरेश आण्णांनी हात झटकले होते.
पण खोक्या पोलिसांना सापडत नव्हता. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो फरार झाला होता. मात्र त्याने मीडिया ट्रायल मधून टीव्ही चॅनेलला मुलाखत देऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करायचा प्रयत्न केला होता. तो पोलिसांना शरण येणार होता. परंतु, तो जर वाल्मीक कराड याच्यासारखा पोलिसांना शरण आला असता तर महाराष्ट्र पोलिसांची नाचक्की झाली असती. त्यामुळे बीड पोलिसांनी खोक्या भोसलेची टीप मिळताच प्रयागराज गाठले आणि तिथेच त्याच्या मुसक्या आवळल्या. पण खोक्या भोसले प्रयागराज मध्ये असल्याची टीप पोलिसांना नेमकी कुणी दिली??, सुरेश आण्णांनी त्याच्यावर धरलेला हात काढून घेतला का??, याची महाराष्ट्रात उत्सुकता निर्माण झाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App